परभणी: (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी परभणी महानगर तर्फे आज माईलस्टोन प्रायमरी स्कूल माळी गल्ली परभणी येथे दिनदयाळ अंत्योदय स्वंय् सहाय्यता महीला बचत गट व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या सौ. भाग्यश्री शिंदे मॅडम, सुत्रसंचलन संतोष व्ही जाधव, आभार प्रदर्शन श्री विजय शेटे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, प्राचार्य सौ.भाग्यश्री शिंदे मॅडम, ज्योती ताई डूब्बे, संघई ताई, घोडके ताई, पुजा शेटे, नितीन वैद्य, आभिक्षे घंटी आदिसह महीला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.


