परभणी (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने व आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात
इंजि. सुहास पंडित यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील,रामभाऊ घाडगे,माजी उपमहापौर भगवानदादा वाघमारे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, माजी महापौर रवी सोनकांबळे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सतीश भिसे तसेच परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत व अभिनंदन केले