जिंतूर (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनधिकृत संकुलातील वादग्रस्त गाळे रविवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवरील तत्कालीन व शासकीय प्रशासक मंडळाने गाळे उभारले होते. परंतु हे गाळे बनावट लेआऊट तयार करून उभारले गेले आहेत,अशी गंभीर तक्रार दाखल झाली, वेगवेगळ्या स्तरावरील चौकशी अखेर हे गाळे अनाधिकृत ठरवले गेले,
येलदरी रस्त्यावरील हे गाळे जमीन दोस्त व्हावेत या दृष्टीने विद्यमान संचालक मंडळाने वेगवेगळ्या स्तरावर कारवाई करीत रविवारी या अनधिकृत गाड्यांवर हातोडा मारला. सकाळी पोलीस बंदोबस्तात हे गाळे हटविण्यात आले तसेच वरुड रस्त्यावरील गाळेही येथे दोन दिवसात हटवण्याचा संकल्प बाजार समितीने सोडला.
दरम्यान बाजार समितीचे यार्डात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते,ते चुकीचा लेआउट बनवूनच. सर्व बांधकाम विभागाच्या हद्दीतील क्षेत्रात हे बांधकाम असल्याने हे बांधकाम काढण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी दिली.