परभणी ( प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज मुंबई येथे ऑनलाईन बैठक घेतली
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अंडर ग्राउंड ड्रेनेज , कर्मचारी सेवानिवृत कर्मचारी यांच्यासाठी सहाय्यक अनुदान, नाट्यगृह, तसेच क्रीडांगण साठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील जमीन हस्तांतरण, यासह इतर विकासकामाबाबत चर्चा झाली जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी सर्व सुयोग्य प्रस्ताव तयार करून माझ्याकडे सादर करावेत मी स्वतः त्या त्या मंत्री व सचिव यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी माझी यंत्रणा कामाला लावणार आहे या बैठकीस पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर आ राजेश विटेकर आ रत्नाकरराव गुट्टे आ राहुल पाटील यांच्या सह प्रधान सचिव नगरविकास गोविंदराज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी चर्चेत सहभाग नोंदवला या ऑनलाईन बैठकीस महानगरपालिकेचे अधिकारी तसेच माजी नगरसेवक अक्षय देशमुख आदी उपस्थित होते