परभणी : प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षीं मंगलवार, दि. 29 एप्रिल रोजी सायंकाळी श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या शोभायात्रेत सर्व हिंदु बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून शोभायात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेची सुरुवात सायंकाळी ठीक ५ वाजता छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार असून सांगता राजाराम सभागृह गांधी पार्क येथे होणार आहे. शोभायात्रेत शक्य असल्यास सर्व पुरुष मंडळीनी भगवा/किशरी शर्ट आणि महीलांनी भगव्याकेशरी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत सर्वांनी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीचे स्वप्नील पिंगळकर यांनी केले आहे.