परभणी (प्रतिनिधी) पाथरी येथील साईबाबा विकास आराखड्यास वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या विकास आराखड्याच्या बैठकीत दिली . तसेच नवीन विकास आराखडा पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून आ राजेश विटेकर यांच्याकडे सोपवित आहे असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बैठकीत दिले ,
पाथरी येथील विकास आराखड्या बाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी नाराजी दर्शविली अत्यंत छोट्या स्वरूपात व ज्या व्यक्तीस कोणत्याही मोठ्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा अनुभव नाही अशा विकासक, सल्लागाराने हा आराखडा तयार केलेला आहे, पंढरपूर, शेगाव, माहूर अशा देवस्थानचा आराखडा तयार केला आहे अशा दर्जेदार आराखडे तयार करणाऱ्या व्यक्तीकडून हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत , नगरपरिषदेने निवडलेल्या सल्लागार यांना बदलण्यात येणार आहे, सद्यस्थितीत फक्त भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असल्याने प्रत्यक्षात कोणतेही विकास कामे सुरू झालेली नाहीत म्हणून अजून सविस्तर आराखडा तयार करण्यात वाव आहे, दर्जेदार , भव्य सुसज्ज आराखड्यामुळे वाढीव निधी लागणार हे निश्चित आहे, त्याची काळजी सोडा, हे काम नियोजन विभागाचे असल्याने मी स्वतः त्या विभागाचा मंत्री असल्याने कितीही निधी लागला तरी मी त्यासाठी कितीहि निधी देण्यास तयार आहे, ” पण जो काही विकास करायचा आहे तो भव्य व दर्जेदार असेल याकडे स्थानिक आमदार म्हणून तु लक्ष घाल , तू म्हणशील तेव्हडा निधी द्यायला तयार आहे, पण महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानाप्रमाणे पाथरी येथील साईबाबा मंदिर व शहराचा विकास करून घेणे ही तुझी जबाबदारी आहे आणि मी ही जबाबदारी तुझ्या वर सोपवत आहे “असे ना पवार यांनी भर बैठकीत आ राजेश विटेकर यांना सांगितले, तसेच भूसंपादनाची प्रक्रिया चालू द्या पण नवीन आराखड्याप्रमाणे कामे करावयाची असल्याने प्रत्यक्षात कोणतेही विकास कामे सुरू करायची नाहीत त्या आराखड्यास मी स्थगिती देत आहे , असे स्पष्ट आदेश नियोजन मंत्री म्हणून देत असल्याचे जिल्हाधिकारी यांना सांगितले , “पुढील महिन्यात राज्यातील हजारो कोटी रुपयांचे मोठे , दर्जेदार विकास आराखडे तयार करणाऱ्या पुणे येथील विकासक, सल्लागार यांना पाथरी येथे पाठवत असून तु त्यांच्या कडून नवीन भव्य आराखडा तयार करून घेण्यासाठी प्रयत्नशील रहा “असेही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आ राजेश विटेकर यांना सांगितले