परभणी (प्रतिनिधी) आर.पी.हॉस्पिटल व परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून काचेची लांब बाटली यशस्वीपणे काढून जीवदान दिले आहे.
एक व्यक्ती पोटदुखीच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाली होती. प्राथमिक तपासणी नंतर शल्य चिकित्सक डॉ.अमीर तडवी यांनी रुग्णाचा एक्स-रे, सोनोग्राफी करून घेतली व पोटात बाटली असल्याचे निश्चित झाल्या नंतर रुग्णाला पोटाच्या आतड्याचा संसर्ग आणि आतड्यात जखमा झाल्याचे आढळून आले.
आर.पी.हॉस्पिटल व परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉ. अमीर तडवी, भुलतज्ञ डॉ.श्रीकांत वांगीकर ओ.टी.स्टाफ संध्या आळणी, किशोर नवले व इतर कर्मचारी यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून ही काचेची बाटली काढली. शस्त्रक्रियेनंतर आणि अतिदक्षता विभागातील औषध उपचारा नंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती पसरताच, स्थानिकांमध्ये कौतुकाबरोबरच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डॉक्टरांनी दाखवलेल्या कौशल्याचे कौतुक होत आहे.
रुग्णाच्या नातेवाइकांकडून परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलचे संचालक आ.डॉ.राहुल पाटील व अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांचे आभार मानले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


