पालम. (प्रतिनिधी) सभागृहच्या माध्यमातून अखंडता जगता येईल असे प्रतिपादन आ. रत्नाकर गुट्टे यांनी दि. १९ रोजी शनिवारी तालुक्यातील खडी येथील स्थानिक निधीतून उभारण्यात आलेल्या तक्षशिला बौद्धविहार सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना आ. गुटे म्हणाले की गावखेड्यात अशी वास्तू असणे गरजेचे आहे. त्यामुळे गरजू व गोरगरीबांना कौटुंबिक सोहळे साजरे करणे शक्य होईल. ग्रामस्थांना एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेता येतील. तसेच त्यातून एकता, अखंडता जपता येईल, असे आ.डॉ.गुट्टे साहेब यांनी म्हटले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रामचंद्र निळे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर लांडगे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पवन सोन्नर, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष गंगाधर मस्के, साहेबराव नखाते, मनोहर पिनाटे, तुकारामजी निळे, माधवराव चामले, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ऍंगडे, सुनील ऍंगडे, यांच्यासह ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, बौद्ध उपासक, उपासिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.