परभणी, (प्रतिनिधी) जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम या भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांना ठार मारले,या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. अतिरेक्यांचा हा हल्ला निंदनीय आणि भ्याड असून केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलून अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी, दहशतवादाला समूळ नष्ट करावे अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली आहे आमदार पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर,युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले,उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे,तालुका प्रमुख नंदू पाटील,महिला आघाडीच्या विधानसभा संघटक अंबिका डहाळे,माजी जिल्हा प्रमुख संदीप भंडारी,माजी शहर प्रमुख अनिल डहाळे,अरविंद देशमुख,शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, माजी नगरसेवक प्रशास ठाकूर, विशू डहाळे, फैजुल्ला पठाण,भैया भारती, निखिल जैन गणेश मुळे, गौतम भराडे, सचिन गारुडी, गोविंद इकर,बंडू जाधव, गजेंद्र चट्टे, रुस्तुम नाईकवाडे, लक्ष्मण बोबडे,श्यामा चांडक, दीपा बोरुळ आदी उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


