परभणी (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष यांनी प्रचाराला सुरुवात केली असून यात उबाटा तसेच महाविकास आघाडीचे डॉ. राहूल पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली असून या दरम्यान त्यांना अनेक संघटना व सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळत आहे यातच जिल्हा झेरॉक्स असोसिएशन, भीमशक्ती ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने परभणी निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अनेक शिंदे गटाच्या कार्यकर्ते यांनी उबाटा गटात प्रवेश केला.
जिल्ह्यातील भीमशक्ती ऑटोरिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल घनसावंत यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांसह आ. डॉ.राहुल पाटील यांना संघटनेचे पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी नामदेव शिंदे, बाळासाहेब जोगदंड, फिरोज पठाण, राजू पाडोळे, चंद्रकांत पोंपलवार, राजू पवार, राज मोहम्मद शेख, दत्ता गिरी, सतीश खरात, कैलास कांबळे, मारुती शिंदे, गजानन खिल्लारे, संजय वाकोडे, अजय गायकवाड, सिद्धार्थ रगडे, बंडू डिघोळे, उमेश अदमाळे यांचा समावेश होता. यावेळी संभानाथ काळे, राहुल कांबळे, मोती शिंदे यांची उपस्थिती होती.
तर जिल्हा झेरॉक्स असोसिएशनच्या वतीने डॉ.राहुल पाटील यांना पाठींबा असल्याचे पत्र देऊन त्यांच्या साथ देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना पत्र सुपूर्द केले. यावेळी अध्यक्ष प्रदीप धर्मशेट्टी, उपाध्यक्ष श्रीराम गर्जे, कोषाध्यक्ष निखिल जैन, सहसचिव प्रशांत लोहेकर, सचिव विजय वैद्य, विशाल भुसारे, संजय कदम, संजय वैद्य, फैजल, शैलेश पाठक, सचिन डुब्बेवार, शैलेश पारवेकर, अक्षय संघई, बाळू खंडागळे, रोहित गर्जे यांची उपस्थिती होती.

शिंदे गटातील अनेक यूवक उबाठा गटात
शहरातील शिंदे गटातील अनेक युवकांनी आ. डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत उबाटा पक्षात प्रवेश केला. यावेळी बालाजी जोगदंड, परमेश्वर बोराडे, रामा लोंढे, देवा खंदारे, बालाजी घाटचळ, प्रताप साळवे, योगेश जोगदंड, धनंजय पवार, विलास शेंडीराव, कैलास शेंडीराव, अविनाश काळे, अविनाश तूपसमुंद्रे, योगेश बुजवणे, अविनाश शिंदे, मारुती गायकवाड, संतोष गाडे, मयूर मोरे, रामा भिसे, गौतम भराडे, राहुल कांबळे, पप्पू वाघमारे, कपिल मकरंद उपस्थित होते. प्रभाग क्रमांक सहा लहुजी नगर भागातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रवेश केला. कार्यक्रमास राहुल कांबळे, गौतम भराडे, कपिल मकरंद यांची उपस्थिती होती


