Author: Lok Sanchar

परभणी:(प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानलपेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बाल विद्यामंदिर हायस्कूलच्या वतीने दिला जाणारा सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांसाठीचा शाळारत्न हा पुरस्कार इयत्ता दहावीतील कु. श्रीया किरण लव्हेकर हिला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. ए. झरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. विलासराव पोहंडूळकर , सदस्य श्री एम.जी.विहीटकर , सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर आदी होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे , उपमुख्याध्यापक आर.जी. तुम्मेवार , प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सिंधू शर्मा , पर्यवेक्षक प्रदीप रूघे, बळीराम कोपरटकर व सीमा बोके आदींची उपस्थिती…

Read More

परभणी,प्रतिनिधी) : वसमत रस्त्यावरील विवेक नगरातील ज्येष्ठ नागरीक मारुती शंकरराव पाठक यांचे गुरुवार 30 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वृध्दापकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी तसेच सेवानिवृत्त अभियंता दीपक पाठक, प्रा. वैभव पाठक व प्रा. विशाल पाठक ही तीने मुले, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थीवावर शुक्रवारी सकाळी 8 वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाठक कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे

Read More

पालम (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय व कृष्णाई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या वेळी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. तसेच शाळेतील मुलांचे कलागुण व कौशल्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून सलग दोनवेळा विजयी झाल्याबद्दल आमदार डॉ रत्नाकर गुट्टे आणि आमदार राजेश दादा विटेकर यांचा शाळेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुहे यांनी मनोगत व्यक्त करून शाळा प्रशासनाचे आभार मानले. तसेच विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणात अनेक अडचणी येतात.पण विध्याथ्यानी प्रयत्न कधीही सोडू नका. हे स्पर्धेचे युग…

Read More

सेलू (प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा तसेच आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सेलू तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. या बाबत माहिती अशी की मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा तसेच राज्यातील 256 तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील साई नाट्यगृह होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सेलू तालुका पत्रकार संघाने केली आहे. आज मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर यांनी सेलू येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी…

Read More

परभणी (प्रतिनिधी) सेलू येथे राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ व आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुकाध्यक्षांचा मेळावा शनिवार 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याहस्ते होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून ना. संजय शिरसाठ हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातच पत्रकारितेत योगदान देणार्‍या पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यता येणार असून या कार्यक्रमास जिल्हाभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके यांच्यासह कार्याध्यक्ष लक्ष्मन मानोलीकर व…

Read More

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक, सर ज.जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालय (सायन) चे अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) चे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण…

Read More

परभणी, (प्रतिनिधी):- जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 7 कलमी कृती कार्यक्रम अंतर्गत 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्यो जकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी, श्री शिवाजी इन्स्टीटयुट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज व श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टीटयुट, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 01 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08:30 वाजता सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी श्री शिवाजी महाविद्यालय कॅम्पस, वसमत रोड, परभणी येथे “पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजीत केला आहे. रोजगार मेळाव्याचे उद्घा टन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री…

Read More

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न परभणी, (प्रतिनिधी):- जिल्हयातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही, यांची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस खासदार फौजिया खान, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर, जिल्हा पोलीस…

Read More

संबर येथील श्री दत्तात्रय महादेव देवस्थानला निधी मिळणार परभणी:(प्रतिनिधी): जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेल्या संबर येथील श्री दत्तात्रय महादेव संस्थान मंदिर अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत होते, पर्यटन विकास योजनेंतर्गत दीड कोटी रुपये निधी शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागणार आहे. त्यामुळे देवस्थान परिसराचे सुशोभीकरण होऊन हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होणार आहे. परभणी जिल्ह्यात जी मोठी देवस्थाने आहेत, त्यातील पुरातन श्री आनंदी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र संबर हे इ.स.१५१७ मधील असून जवळपास ५०८ वर्षांपूर्वीचे आहे. या देवस्थानला विदर्भ, मराठवाडा, खानदेश व शेजारील राज्यांतूनही भाविकांचा दर्शनासाठी मोठा ओघ सुरू असतो. मोठे देवस्थान असतांनाही राज्य शासनाने हे ठिकाण ‘क’ वर्ग पर्यटनमध्ये…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) परभणी येथील पेडगाव रस्त्यावरील आर.पी.हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे १ जानेवारी पासून सुरू असलेल्या शिबिर अंतर्गत १८० पेक्षा जास्त अँजियोग्राफी करण्यात आल्या असून एक अत्यंत अवघड अशी कटिंग बलून अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले आहेत. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आर.पी. हॉस्पिटल येथे एक जानेवारीपासून मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर घेतले जात आहे या शिबिरात तपासणी केलेल्या एक ४५ वर्षांचा रुग्ण छाती दुखत असल्यामुळे आर पी हॉस्पिटल मध्ये दाखल झाला. तपासणी दरम्यान रुग्णाचा इ.सी.जी, व 2-डी इको करून घेण्यात आली. त्यात रुग्णावर तात्काळ अँजिओग्राफी करणे गरजेचे असल्याने नातेवाईकाला सांगून अँजीओंग्राफी केली. अँजीओंग्राफी रिपोर्ट मध्ये रुग्णाच्या…

Read More