Author: Lok Sanchar

पालम (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा हौशी शुटिंग बॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजीत स्व.प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ 38 वी राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2024-25 सब ज्युनिअर व ज्युनिअर मुले, मुली 17 व 19 व वयोगट दिनांक 1 व 2 फेब्रुवारी 2025 स्थळ एस.ए. मिशन हायस्कूल, नंदुरबार येथे संपन्न झाली. यावेळी एकून आठेचाळीस संघ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अड राम भैय्या रघुवंशी प्रमूख पाहूणे मा.डा. राजेश वळवी, के.आर. ठाकरे हे होते. या मध्ये सय्यद साद सादेक, समिक्षा देशमुख, विठ्ठल कदम यांची निवड करण्यात आली. सब ज्युनिअर मूली मध्ये कदम रधिका रमेशराव, कदम…

Read More

परभणी (प्रतिनिधी) येथील पाथरी रस्त्यावरील परभणी मेडिकल कॉलेज येथे सर्व डॉक्टरांसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) अंतर्गत प्रशिक्षणाचे सत्र घेण्यात आले. हे प्रशिक्षण वैद्यकीय कागदपत्रांचे सुसूत्रीकरण व मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ (MCCD) नियमांच्या पालन सुधारण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत सर्व डॉक्टरांसाठी आणि दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत सर्व परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे सत्र घेण्यात आले. यावेळी परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आमिर तडवी, प्रशासकीय अधिकारी गुणवंत आहिरे, मुख्य समन्वयक डॉ.रोहन बेंबरे, डॉ.ओमप्रसाद दामकोंडवर यांची उपस्थिती होती. यावेळी सहभागी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जन्म-मृत्यू नोंदणी, अत्याधुनिक वैद्यकीय…

Read More

परभणी (प्रतिनिधी) जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने आज सोमवार 3 फेब्रुवारी रोजी कोषागार दिन निमित्त दिपप्रज्वलन अपर जिल्हाधिकारी डाॅ.प्रताप काळे व पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते पार पडले आसुन यावेळी प्रताप काळे व रविंद्रसिह परदेशी यांचा भव्य सत्कार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. आहे.यावेळी आनेक मान्यवरांनी कोषागार दिन निमित्त भाषने केले.तर प्रमुख अतिथी म्हणुन अपर जिल्हाधिकारी डाॅ.प्रताप काळे,पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे,मुख्य लेखा परिक्षक व मनपाचे डाॅ.श्रीरंग भुतडा,विद्यापीठाचे नियंत्रक निर्मळ,सहाय्यक संचालक डाॅ.प्रकाश दासे,जिल्हा कोषागार अधिकारी डाॅ.दत्ता भांगे,संघटक अध्यक्ष कैलास अवरगंड,कवी डाॅ.केशव खटिंग,संतोष नारायणकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर कोषागार अधिकारी निलकंठ पाचंगे…

Read More

परभणी (प्रतिनिधी) एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाºया हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. यांच्या उर्सानिमीत्त दर्गा परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने दर्गाह हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. यांच्याबद्दल माहीतीपर पुस्तक काढण्यात येते. या पुस्तकांचे दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता दर्गा परिसरात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाला तुरतपीर बाबाअसेही म्हणतात. तात्काळ नवसाला पावणारी दर्गा म्हणून सर्वदूर ओळखली जाते. उर्सानिमीत्त या ठिकाणी लाखो भावीक भक्त परभणी जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून व पर राज्यातून श्रध्देने दर्शनासाठी येतात. या ठिकाणी होणाºया सर्व कार्यक्रमाची माहीती तसेच दर्गाबद्दल संपुर्ण माहीती पुरविण्यासाठी संयोजकपद दिले जाते.…

Read More

परभणी(प्रतिनिधी) जैन समाजातील श्रावक शरद वसंतराव अंबुरे, यांचे आज (दि.2) दुपारी निधन झाले. मृत्यु समयी यांचे वय 67वर्ष होते. शरद अंबुरे हे सेवा निवृत्त कृषी अधिकारी होते. इंडेन गॅस चे राजेश अंबुरें याचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, सूना, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 7 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंबुरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे.

Read More

परभणी (प्रतिनिधी)  स्व.ॲड. शेषराव घोंडजी भरोसे यांच्या स्मृतीनिमित्त पाचव्यांदा संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभास उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. राजेश विटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते तथा संयोजक आनंद भरोसे यांनी दिली. कृषी संजीवनी महोत्सवात निरनिराळे ६ दालन उभारण्यात येणार आहेत. हे दालन अत्याधुनिक डोम पद्धतीने भव्य जम्बो मंडप उभारले जाणार आहेत. तसेच प्री-…

Read More

पालम (प्रतिनिधी ) शहरातील गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेज जवळ असलेल्या एसबीआय चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी दि.2 फेबुरवारीच्या पहाटे तीन वाजन्याच्या सुमारात गॅस कटरच्या साह्याने ए टी एम तोडून आतील रक्कम लंपास केली आहे. या घटनेने पालम शहरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, सपोनी आर.के.मुंढे यांनी पाहणी केली. सदरील एटीएम फोडण्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वारा जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा कलर चा स्प्रे मारल्याचे निदर्शनात आढळून आले. दरम्यान एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएम मध्ये 25…

Read More

पालम (प्रतिनिधी )ज्येष्ठ पत्रकार पंडितराव डिगांबरराव नाईकवाडे वय ६८ वर्ष रा. पालम यांचे शुक्रवारी पहाटे १२.२० वाजता उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पार्थिवदेहावर पालम शहरातील गंगाखेड रोड येथील हिंदू स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी १२. वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी ४० वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली. अंत्यसंस्कार वेळी पत्रकार,डॉक्टर,वकिल, सामाजीक कार्यक्रते, पोलीस पाटील,नेते मडळी सरपंच,राशन दुकानदार आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन मुली, सूना, जावई,नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार मारोती नाईकवाडे, प्रा.माधव नाईकवाडे, रामदास नाईकवाडे यांचे ते वडील होत. त्यांना पालम तालुका पत्रकार संघाकडून त्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली.

Read More

परभणी (प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने 1 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा संपन्न होत आहे.. या मेळाव्याच्या निमित्तानं पुणे ते सेलू अशी पत्रकार एकता रॅली काढण्यात येणार आहे. सेलू येथे आल्यानंतर जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघाच्या वतीने या रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे. शुक्रवारी  31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून रँलीला सुरूवात होईल. ही रॅली शिक्रापूर, शिरूर, नगर, कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा , बीड, वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथरी मार्गे रात्री 8 वाजेपर्यंत सेलू येथे पोहोचेल. पुणे येथून रॅलीचे निघाल्यानंतर मार्गावरील तालुका संघांनी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : शहीद सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे व सरपंच संतोष देशमुख यांच्या यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये अर्थसहाय्य द्यावे व एका व्यक्तीला कायमस्वरुपी शासकीय नोकरीत समाविष्ट करावे यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मध्यवस्तीतील शनिवार बाजारातून दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरीकही सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. सर्वजीत बनसोडे, महासचिव अनिल जाधव, राज्यसदस्य अविनाश भोसीकर, ज्येष्ठ नेते धम्मपाल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष (उत्तर) तुकाराम भारती, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता…

Read More