परभणी (प्रतिनिधी) एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाºया हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. यांच्या उर्सानिमीत्त दर्गा परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने दर्गाह हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. यांच्याबद्दल माहीतीपर पुस्तक काढण्यात येते. या पुस्तकांचे दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता दर्गा परिसरात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाला तुरतपीर बाबाअसेही म्हणतात. तात्काळ नवसाला पावणारी दर्गा म्हणून सर्वदूर ओळखली जाते. उर्सानिमीत्त या ठिकाणी लाखो भावीक भक्त परभणी जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून व पर राज्यातून श्रध्देने दर्शनासाठी येतात. या ठिकाणी होणाºया सर्व कार्यक्रमाची माहीती तसेच दर्गाबद्दल संपुर्ण माहीती पुरविण्यासाठी संयोजकपद दिले जाते. यावर्षी संयोजकपदी दै. लोकप्रश्नचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार मोईन खान यांची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी दर्गाबद्दल संपुर्ण माहीती असलेले पुस्तक व पोस्टरचे प्रकाशन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेसी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रविंद्रसिह परदेशी, तहसिलदार राजापुरे, वक्फ बोर्डचे मुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहेमद शेख, जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान खान,पत्रकार मोईन खान ,मुन्तजीम अशरफ कादरी, लिपीक मो.मुदसीर, अतीक खान,सैफ मनियार, सय्यद अहेमद, जमील अहेमद खान, उर्स कमिटीचे सदस्य इंजि. समद, काजी फहीम, मौ.रफीयोद्दीन अशरफी, शेख शब्बीर,शेख खैसर, शेख नेहाल, अॅड. माधुरी क्षीरसागर, मा.नगरसेवक शेख अली, वाजीद जागीरदार आदी उपस्थित होते.


