पालम (प्रतिनिधी )ज्येष्ठ पत्रकार पंडितराव डिगांबरराव नाईकवाडे वय ६८ वर्ष रा. पालम यांचे शुक्रवारी पहाटे १२.२० वाजता उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पार्थिवदेहावर पालम शहरातील गंगाखेड रोड येथील हिंदू स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी १२. वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी ४० वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली. अंत्यसंस्कार वेळी पत्रकार,डॉक्टर,वकिल,
सामाजीक कार्यक्रते, पोलीस पाटील,नेते मडळी सरपंच,राशन दुकानदार आदी उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन मुली, सूना, जावई,नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार मारोती नाईकवाडे, प्रा.माधव नाईकवाडे, रामदास नाईकवाडे यांचे ते वडील होत. त्यांना पालम तालुका पत्रकार संघाकडून त्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली.


