Author: Lok Sanchar

सांस्कृतिक कार्यक्रमात बाळ चिमुकल्यांनी विविध गीताचा बोलावर नृत्य सादरीकरण करून उपस्थितचे मने जिंकले गंगाखेड ( प्रतिनिधी) गंगाखेड शहरातील डिस्कवरी इंग्लिश स्कूल इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अल्प दरात फीस घेऊन दर्जेदार उत्तम शिक्षण देण्याचे काम गेल्या पंधरा वर्षापासून करत आहे डिस्कवरी शाळा माझा परिवार समजतो म्हणून मी सदैव डिस्कवरी च्या शैक्षणिक विकासासाठी डिस्कवरी शाळेच्या परिवारा च्या खंबीर पाठीशी आहे असे प्रतिपादन आमदार डॉ राहुल पाटील यांनी गंगाखेड येथे डिस्कवरी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. दिनांक 26 जानेवारी रोजी कापसे गार्डन सभागृहात डिस्कवरी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य नरेंद्र दास त्यागी महाराज धसाडी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार डॉ…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी सारख्या तालुक्यातून 3 हजार 202 बांगलादेशीय रोहिंग्यांना प्रशासनाद्वारे जन्म प्रमाणपत्र वितरीत झाले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी परभणीत एका बैठकीतून व्यक्त केले. या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील संबंधितांविरुध्द कठोर कारवाई तर होईलच परंतु, या देशविरोधी षडयंत्राची अधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, भविष्यात या पध्दतीची बनावट प्रमाणपत्रे वितरित होणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा इशारा दिला. भाजपाचे नेते सोमय्या हे मंगळवार 28 जानेवारी रोजी दुपारी सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यानिशी जालन्याहून वाहनांद्वारे परभणीत दाखल झाले. लगेचच जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सोमय्या यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,…

Read More

सेलूत गीता ज्ञान महोत्सव सेलू,(प्रतिनिधी) : गीता हे एक अहिंसात्मक आणि मानवाच्या जीवनात येणार्‍या समस्यांचे समाधान सांगणारे शास्त्र आहे. श्रेष्ठ परिवर्तनासाठी आध्यात्मिकता, प्रभु चिंतन आणि स्वचिंतनाची गरज आहे. संस्कारी पिढी घडविण्याचे आणि जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग म्हणजे गीता आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी राजयोगिनी भारतीदीदी यांनी केले. येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या वतीने श्री साईबाबा मंदिरात आयोजित श्रीमद् भगवत गीता ज्ञान महोत्सवाचे उद्घाटन सोमवार 27 जानेवारी रोजी झाले. त्यावेळी भारती दीदी बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जि. प. सभापती अशोक काकडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, उर्मिला बोराडे, ललिता गिल्डा, ब्रह्माकुमारी शांता बहेन, नंदा बहेन, अर्चना बहेन, सविता बहेन आदींची…

Read More

पालम (प्रतिनिधी) गेल्या कित्येक वर्षा पासुन पालम तालुक्यातील तांबूळगाव,सिपेगाव, मुदखेड ह्या तीन गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या प्रतीक्षेत तिन्ही गावाचे लोकं होते. अखेर खा. संजय जाधव यांच्या प्रयत्नातुन हि प्रतिक्षा संपली मागच्या वर्षी गावातील लोकांनी आंदोलन केले होते ह्या वेळी खासदार संजय जाधव यांनी गावकऱ्यांना शब्द दिला होता. रस्ता पुर्ण करुन देईल आणि आज दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खासदार संजय जाधव यांनी कार्यक्रमाचं भूमिपूजन करुन दिलेला शब्द पुर्ण केला. ह्या वेळी बोलताना संजय जाधव म्हणाले की ह्या नंतर गावातील मुलभूत विकासा साठी मी नेहमीच कट्टीबद्द आहे. ह्या संजय जाधव यांचा तिन्ही गावाच्या लोकांकडून सत्कार करण्यात आला…. हया वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असणाऱ्या शहरातील हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब रहे. (तुरतपीर बाबा दर्गा) उर्साच्या कालावधीत भाविकांना आवश्यक सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आज खासदार फौजिया खान, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी आज दर्ग्याला भेट देऊन परिसराची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. ऊर्स परिसरात थाटण्यात येणाऱ्या दुकाना, रस्ते, वीज, पार्किंग, वाहतुक व्यवस्था, सी.सी.टिव्ही. अग्नीशामक पथक, स्वच्छता, आरोग्य पथक या सर्वांचे व्यवस्थापन नियोजनानुसार करावे. भाविकांना जाण्या-येण्यासाठी रस्ते रुंद ठेवावेत जेणकरुन मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही.…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे  पाथरी मतदारसंघाचे आ. राजेश विटेकर यांची पक्षश्रेष्ठींद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने व पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याहस्ते मंगळवार 28 जानेवारी रोजी आ. विटेकर यांना हे नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष तथा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती. या नियुक्तीबद्द आमदार विटेकर यांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान, पक्षाने वेळोवेळी दिलेल्या संधीमुळेच आपणास इथपर्यंतचा प्रवास करता आला. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासह पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्‍वास आ. विटेकर…

Read More

सेलू (प्रतिनिधी ) मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील सर्व तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी सेलू नगरी सज्ज असून या शहराची ओळख सांस्कृतिक नगरी असल्याने हा सोहळा दिमाखदार होणार असल्याची माहिती साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अदयक्ष हेमंत आडळकर यांनी दिली आहे. मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील 256 तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अदयक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 1 फेब्रुवारी 25 रोजी सेलू येथील साई नाट्य मंदिर येथे संपन्न होत आहेत या मेळाव्या बाबत आडळकर बोलत होते .ते पुढे म्हणाले की सेलू शहरात प्रथमच राज्यभरातून पत्रकार येत आहेत . सेलू शहरात…

Read More

नूतनमध्ये घर घर संविधान उपक्रम संपन्न सेलू (प्रतिनिधी) भारतीय लोकशाही ही केवळ राजकीय लोकशाही नाही. तर ती सामाजिक व आर्थिक लोकशाही आहे. संविधानाने आदर्श लोकशाही निर्माण करून सर्वस्तरातील नागरिकांना विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. असे प्रतिपादन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. ते नूतन विद्यालयात आयोजित शिक्षण विभागाच्या घर घर संविधान या उपक्रमात शनिवार ( दि. २५ ) रोजी राष्ट्रीय मतदार दिनी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक किरण देशपांडे हे होते. व्यासपीठावर गणेश माळवे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. सुरेश हिवाळे म्हणाले की, ‘ भारतीय संविधानाने समानतेचा हक्क दिला. लोकशाही बळकट केली. संविधान हे सुसंस्कृत नागरिक घडवण्याची आचारसंहिता आहे. मतदान…

Read More

पालम बसस्थानका साठीपरिवहन मंत्री यांची घेतली भेट पालम (प्रतिनिधी) मागील अनेक दशकापासून पालमच्या बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आहे. हा प्रश्न मार्गी लावू अशी वाही गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे. पालम हे तालुक्याचे ठिकाण असून मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून पुणे, बीड, परळी लातुर, नांदेड, परभणी आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड संख्या आहे. गंगाखेड ते लोहा राष्ट्रीय मार्ग असल्याने या मार्गावर पालम तालुक्यातुन प्रवासी मोठया संख्येने प्रवास करत असतात. पण पालम शहरात येनाऱ्यां जानाऱ्यां प्रवाशांना थांबण्यासाठी अजूनही बस स्थानकाचे निर्माण झालेले…

Read More

परभणी (प्रतिनिधी) आजचा विद्यार्थी अत्यंत हुशार आहे. परंतु त्याने त्याच्यात असलेल्या बुद्धिमत्ता व हुशारीचा उपयोग शाश्वत भल्यासाठी करणे आवश्यक आहे. आज त्यांच्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत .परंतु त्यातून भविष्य आणि व्यक्तिमत्व अधिकाधिक विकसित करणाऱ्या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केल्यास भावी जीवनाची वाटचाल निश्चितपणे यशस्वी होऊ शकते. त्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी क्षणिक व मनोरंजनाच्या माध्यमाकडे लक्ष न देता वाचन लेखन सशक्त माध्यमाकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. असे प्रतिपादन कवी प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी केले. राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 24. 1. 2025 रोजी ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त विशेष अतिथी व्याख्यान प्रसंगी…

Read More