सांस्कृतिक कार्यक्रमात बाळ चिमुकल्यांनी विविध गीताचा बोलावर नृत्य सादरीकरण करून उपस्थितचे मने जिंकले
गंगाखेड ( प्रतिनिधी) गंगाखेड शहरातील डिस्कवरी इंग्लिश स्कूल इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अल्प दरात फीस घेऊन दर्जेदार उत्तम शिक्षण देण्याचे काम गेल्या पंधरा वर्षापासून करत आहे डिस्कवरी शाळा माझा परिवार समजतो म्हणून मी सदैव डिस्कवरी च्या शैक्षणिक विकासासाठी डिस्कवरी शाळेच्या परिवारा च्या खंबीर पाठीशी आहे असे प्रतिपादन आमदार डॉ राहुल पाटील यांनी गंगाखेड येथे डिस्कवरी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी कापसे गार्डन सभागृहात डिस्कवरी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य नरेंद्र दास त्यागी महाराज धसाडी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार डॉ राहुल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष तथा बाल विद्या मंदिर संस्थेचे सचिव डॉ विवेक नावंदर, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, गटशिक्षणाधिकारी भगवान ठुले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे संस्थापक बाळासाहेब राखे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत फुटके, बालाजी मुंडे, पोस्ट मास्तर देविदास हाके,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य दिगंबर मोरे, अध्यक्ष प्राध्यापक जयश्री पछडे, संत जनाबाई मंदिर संस्थान विश्वस्त, सचिव शिवाजी चौधरी, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, केंद्रप्रमुख बालाजी दराडे शाळेच्या प्रिन्सिपल सीमा राखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी अविरत काम करण्याची माझी तयारी आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या अधिवेशनात सभागृहात प्रश्न मांडून अंमलबजानीचा आग्रह सरकारला करणार आहे. परभणी जिल्ह्यात शैक्षणिक विकासासाठी सायन्स पार्क, दोन मेडिकल कॉलेज, सुसज्ज ग्रंथालय व अन्य बाबी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून सुरू केले आहे.
यावेळी आमदार डॉ राहुल पाटील तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल गंगाखेड आणि डिस्कवरी परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेची सर्वोच्च पुरस्कार शाळा रत्न मुलांमध्ये कशप चुडावेकर तर मुली मधून शरयू वंजारे यांच्यासह ओबिडी इन स्टुडन्ट अंश कुलकर्णी , क्रीडा रत्न, आदित्य जामगे , कलारत्न अंजली ढवळे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रिन्सिपल सीमा राखे, तर सूत्रसंचालन अबोली जोशी आभार श्रीनिवास कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शुभांगी कुलकर्णी, रुपश्री पांडे, ललिता जयराम, शीतल शिवणकर, अंजली कुलकर्णी, अमरजा जोशी,शर्मिला जाधव, मनीषा अंबुरे, सीमा डोंगरकर, सीमा भोजक, सरिता नोमुलवार,कविता पारेख,वैशाली अंबुरे, अनुराधा मुलगीर, ऐश्वर्या अय्या नाल्टे ,अंकिता शिंदे, शिवानी जगताप, विद्या राठोड यांच्यासह बाळू कराळे, लक्ष्मण ढेबरे, पराजित भुमरे, गणपत क्षीरसागर, कैलास मुलगीर, मंगल, ध्रुपदा, अर्चना, बारटक्के आदीने परिश्रम घेतले.


