परभणी (प्रतिनिधी) आजचा विद्यार्थी अत्यंत हुशार आहे. परंतु त्याने त्याच्यात असलेल्या बुद्धिमत्ता व हुशारीचा उपयोग शाश्वत भल्यासाठी करणे आवश्यक आहे. आज त्यांच्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत .परंतु त्यातून भविष्य आणि व्यक्तिमत्व अधिकाधिक विकसित करणाऱ्या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केल्यास भावी जीवनाची वाटचाल निश्चितपणे यशस्वी होऊ शकते. त्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी क्षणिक व मनोरंजनाच्या माध्यमाकडे लक्ष न देता वाचन लेखन सशक्त माध्यमाकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. असे प्रतिपादन कवी प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी केले.
राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 24. 1. 2025 रोजी ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त विशेष अतिथी व्याख्यान प्रसंगी ” मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी ” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मुंजाजी गायके होते. तर विचार मंचावर डॉ. कल्याण गोपनर, डॉ. सुरेश कदम, प्रा. योगेश कुऱ्हाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्रा. व्हरगुळे म्हणाले की, भाषा ही भाषा असते. ती श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसते .आपण त्या भाषेवर किती आणि कसे प्रेम करतो? त्यानुसार आपल्याला भाषेतून मानसन्मान प्रतिष्ठा आणि परतावा मिळत असतो. म्हणून मराठी भाषा संवर्धित करण्यासाठी प्रत्येक माणसाकडून योगदानाची नितांत गरज आहे. त्यात वाचन, लेखन ,पटकथा, ब्लॉग, माहितीपट , चित्रपट गीत, संवाद आणि नवनिर्मिती आज काळाची गरज आहे .अशा उज्वल माध्यमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन प्रेरित व्हावे आणि आपल्या जीवन जगण्याची वाट अधिक समृद्ध करावी. आपले जीवन दुःख व नैराश्यात न घालवता मराठी वाड्मयातील विविध प्रकाराचे वाचन आणि लेखन करावे. तेव्हाच आपले मन हलके व आनंदी होईल. त्याबरोबर जगणेही समृद्ध होऊन जाते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. गायके म्हणाले की प्रत्येक माणसाच्या अभिव्यक्तीचे भाषा हेच प्रभावी माध्यम आहे .प्रत्येक भाषिकांनी तिची काळजी घेणे गरजेचे आहे .तेव्हाच भाषा आपले जीवन सुखकर करते. भाषा त्या त्या काळात टिकली आणि जगली तरच पुढील काळापर्यंत पोहोचते. त्यासाठी तिचा सर्वच क्षेत्रात सक्षमपणे वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. असे यावेळी बोलताना म्हणाले.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ. कल्याण गोपनर यांनी केले. तर सूत्रसंचालन कु. पूजा गुरवे हिने केले .तर आभार सय्यद आखेद यांनी मानले. यावेळी डॉ.मोतीराम कदम, प्रा. भालेराव ,प्रा. ठाकूर प्रा. चौकट आदी व इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


