परभणी,(प्रतिनिधी) : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी येथे भरदिवसा घरफोडी करून तब्बल 2 लाख 9 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणार्या दोन चोरट्यांना ताडकळस पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.
याबाबत करुणा गुलचंद राजभोज (रा. राहुलनगर, परभणी) यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पिंगळी येथील त्यांच्या आई-वडिलांच्या घरात 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे सेवन पीस, 45 हजार रुपये किमतीची सोन्याची बदाम अंगठी तसेच 44 हजार रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे चांदीचे हातातील दंडकडे असा एकूण 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या सहा तासांत आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राधेश्याम पी. रामगोपाल गुप्ता (वय 22, रा. जैतापूर महुआ, ता. तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. भोसरी, पुणे) आणि रवि गोविंद पाल (वय 20, रा. बरमपुरा, ता. सोहरतगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे सेवन पीस, सोन्याची अंगठी तसेच 20 तोळे वजनाचे चांदीचे दंडकडे असा एकूण 2 लाख 9 हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 215/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3) व 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन रणखांब पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन रणखांब, बालाजी रणेर, भगवान चोरघडे आणि राहुल वडमारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Tuesday, August 4
ताज्या बातम्या:
- परभणीच्या. गोल्ड मेडलिस्ट यासीन खान मुजफ्फर खानची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सुवर्ण कामगिरी
- 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण; हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांना सूचना
- नांदेड रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; एका दिवसात 1,087 प्रकरणे, सुमारे सहा लाखांचा दंड वसूल : 29 गाड्यांची तपासणी
- दर्गा रोड परिसरातून पाच गायींसह वासरू चोरट्यांनी केले लंपास : कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
- अवघ्या सहा तासांत घरफोडीचा छडा; दोन सराईत चोरटे जेरबंद : पिंगळीतील 2 लाख 9 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत; ताडकळस पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत 20 हून अधिक तंत्रज्ञांचा वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेत प्रवेश
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
- बेपत्ता तरुणीची माहिती देण्याचे आवाहन


