परभणी, (प्रतिनिधी) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, (दि. १९) रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई येथून देवगिरी एक्स्प्रेसने सकाळी साडे सात वाजता परभणी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ७.४० वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांची वेळ राखीव असेल. सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
यानंतर दुपारी १ वाजता सिद्धार्थनगर, पूर्णा येथील दिवंगत भीमराव लोखंडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १.४५ वाजता गौर, ता. पूर्णा येथील दिवंगत संतोष सावळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी ३ वाजता ते नांदेडकडे प्रयाण करतील.
*-*-*-*-*


