भाजपच्या सनातनी प्रवर्तीविरोधात भीमशक्तीचे प्रतीकात्मक मुंडन व पिंडदान आंदोलन संपन्न
परभणीः(प्रतिनिधी) उत्तराखंड राज्यातील हलदानी येथील रामलीला मैदानातील राष्ट्रीय कोंग्रेसचे अध्यक्ष व सर्वोच्च राज्यसभा सभाग्रहातील विरोधी पक्ष नेते मा. मलिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून गोमूत्रद्वारे शुद्धिकरण करण्यात आलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमशक्तीच्या वतीने प्रतीकात्मक मुंडन व सत्यशोधक यज्ञ करून आंदोलन करण्यात आले..
माजी मंत्री तथा राज्यसभा खासदार मा . चंद्रकांतजी हंडोरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले आहे. समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मुल्यांच्या विरोधात प्रतिगामी व सनातनी प्रवृतीचा यावेळी निषेध करण्यात आला..
सदरिल आंदोलनात भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांच्या नेतृत्वत अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करुण तीव्र निषेध केला व प्रतीकात्मक सत्यशोधक यज्ञ करुन जातीय व समाजिक भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृतीच्या विरोधात भूमिका स्पष्ट करण्यात आली..
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सतीश भिसे म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरीकाला समानता, स्वतंत्र व बंधुतेचा अधिकार दिला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितिमुळे एखादी जागा अपवित्र होते त्यानंतर तिचे शुद्धिकरण करावे लागते अशी मानसिकता सामाजिक समता व संविधानिक मूल्याणा छेद देणारी आहे. अशा प्रवृतीचा लोकशाही मार्गाने निषेध करने आवश्यक आहे.
प्रवक्ते सुहास पंडित यांनी बोलताना सांगितले कि आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून या जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला.ज्या मनुवादी प्रवृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारण्याचा प्रयत्न केला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचे गोळे व दगड फेकले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारला आणि राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाकारला, त्याच विषारी मानसिकतेविरोधात आजही काँग्रेसचा संघर्ष सुरू आहे. भीमशक्तीच्या आन्दोलनातुन सामाजिक समता, संविधानिक मूल्य आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. भविष्यातही समाजात भेदभाव व प्रतिगामी विचाराणा प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात लोकशाही व शांतता पूर्वक मार्गाने संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी मा. विजयकुमार सुखदेव, सतीश भिसे, सुहास पंडित, नितिन सावंत, विक्रम काळे, प्रसाद गोरे, संघरत्न हातागळे, सिद्धार्थ भिंगारे, दिपक कनकुटे, संजय वाव्हळे, राहुल डुमने, अंकुश वानखेडे, भगवान लांबटिळे, आप्पा सुर्यवंशी, सिध्दार्थ उघडे, शेख ताजोद्दिन, विशाल घोडके, संतोष गायकवाड, नंदु मोरे, तुकाराम मुंढे, साजीद खान, सय्यद नसीर, अनिल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


