परभणी,(प्रतिनिधी) : व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अनुभवी व नवोदित पदाधिकार्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नवनिर्वाचित कार्यकारिणीत विजय चोरडिया यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजितदादा कुंकलोळ यांची उत्तर-दक्षिण विभागीय प्रदेशाध्यक्ष, तर नरेंद्र देशमुख यांची पूर्व-पश्चिम विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी मिलिंद टोके आणि महेश पांचाळ, राज्य सरचिटणीसपदी गजानन देशमुख व सचिन मोहिते, तर राज्य उपाध्यक्षपदी संगम कोटलवार, चंद्रशेखर भोयर, अभिजीत दरेकर आणि गणेश जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य संघटक म्हणून लक्ष्मण बगाडे, राहुल धोका, जयेश काटे आणि इर्शाद शेख यांची निवड करण्यात आली असून कार्यवाहकपदी तानाजी घोडके, वैभव मोहिते, अमित बागडे, संजय तीपाले, राजू कापसे, गजानन बाजारे, अशोक मिश्रा, मुकुंद जोशी, अनिल चव्हाण आणि रखमाजी सुपारे यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवक्तेपदी नरेश पाटील, प्रमोद पानबुडे, रुपेश जाधव आणि आशिष शेंडगे यांची नियुक्ती झाली असून खजिनदार म्हणून गायत्री ढवळे आणि परेश राऊत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय सहसंघटक म्हणून अहमद नूर, सुरेश जगताप, समीर माडेश्वर आणि अनिल करंदकर, सहसरचिटणीस म्हणून प्रशांत गोडसे, धनंजय कपाले, गुरुदास गुरुमुळे आणि ओंकार हिंगमिरे, तर सहकार्यवाहक म्हणून मलिकार्जुन धारूरकर, दीपक ढवळे, अरुण मोडक आणि शेख लाल शेख यांची निवड करण्यात आली आहे. राज्य संयोजक म्हणून गोरक्षनाथ नेहे, नीतू विश्वकर्मा, राकेश कलाल, रियाज मुल्ला, संजय घेवारे, सोमनाथ पवार, महेंद्र पवार, मनोज कामंडी, संतोष चराटे आणि अब्दुल आतिक यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणीत राज्यातील सर्व विभाग आणि जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटित आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी ही टीम कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल परभणी जिल्ह्यातून नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारणार : विजय चोरडिया
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी सांगितले की, पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, घरकुल, अद्ययावत तंत्रज्ञान, पेन्शन, अधिस्वीकृती तसेच इतर प्रलंबित प्रशन सोडविण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया राज्यभर संघटित आणि प्रभावी लढा उभारेल. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देणे हेच संघटनेचे प्रमुख ध्येय राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.


