व्हॉईस ऑफ मीडिया सदस्यांचा झाला सन्मान, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची उपस्थिती गंगाखेड (प्रतिनिधी) देश, संविधान उध्दवस्त करण्यासाठी एक टीम कामाला लागली आहे. आपल्याला प्रजासत्ताक देश वाचवण्याचे काम करायचे आहे. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांना वाळवी लागली असुन आणीबाणीचा काळ आणि देशातील आजची परिस्थिती सारखीच असल्यामुळे पत्रकार असलेल्या चौथ्या स्तंभाला आता पुढे यावे लागेल असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी गंगाखेड येथे आयोजित व्हॉईस ऑफ मीडिया दर्पण दिन सोहळ्या प्रसंगी बोलताना केले. व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेच्या वतीने रविवार १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे दर्पण दिनानिमित्त दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करून पत्रकारांना…
Author: Lok Sanchar
पालम(प्रतिनिधी) दीपगंगा भगीरथीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील साहित्य, काव्य, आरोग्य क्षेत्रात, प्रशासकीय अधिकारी, उद्योग, शिक्षण ,क्रीडा ,कायदा, युवा क्षेत्रामध्ये व्याख्याते म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा दीपगंगा भगीरथी सेवाभावी संस्थांच्या वतीने प्रत्येक वर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो . 2024 साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींकडून तब्बल 2286 प्रस्ताव संस्थेच्या वतीने मागवण्यात आले. त्यामधून सोळा विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक 20 जानेवारी रोजी शाहू स्मारक, दसरा चौक ,कोल्हापूर या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, समजकल्याण उपयुक्त विशाल लोंढे , जिवंज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट…
परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को -ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व. राष्ट्रीय तसेच फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लिमिटेडचे प्रायोजकत्व लाभले आहे. १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०३०पर्यंत पाच वर्षांसाठी हा करार झाला असून, त्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लिमिटेडकडून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला ९५ लाख रुपये देण्यात आले. बारामती येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि.चे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा धनादेश महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस बाबुराव चांदेरे आणि कोषाध्यक्ष मंगल पांडे यांना सुपूर्द केला.…
परभणी (प्रतिनिधी) : सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यामध्ये आमदार डॉ.राहुल पाटील यांचा नेहमीच भर असतो. अशा कार्यक्रमांना मला आवर्जून जावे वाटते. कारण, केवळ लोकप्रतिनिधी म्हणून ते भूमिका पार पाडत नाहीत तर त्यांच्यातील डॉक्टर सुद्धा समाजात अमुलाग्र बदल घडावेत, यासाठी धडपडत असतो. इतरांचे दुःख, त्यांच्या अडीअडचणी सोडविताना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम आजपर्यंत आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे. ते लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर यांचा उत्तम संगम असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केले. परभणी मेडिकल कॉलेज यांच्या सहयोगाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (सीएसआर निधी) अंतर्गत (गेल इंडिया लिमिटेड व बीपीसीएल यांचा संयुक्त प्रकल्प) मध्ये भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील बी रघुनाथ सभागृहात आज रविवार 19 जानेवारी रोजी धम्ममैत्री संवाद अभियानाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्यात्या म्हणून सुरेखा पैठणे या होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलंकृता बगाटे या होत्या व उद्घाटक म्हणून मिलिंद सावंत हे होते. याच बरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ भारत कदम, धम्मदीप रोडे, प्रमोद कुटे, गौतम मुंढे, डॉ. धनंजय बनकर, किरण मानवतकर, रानुबाई वायवळ, सुनीता साळवे, वर्षा सेलसुरेकर, अनिता सरोदे, भूषण मोरे आदीं मान्यवर उपस्थित होते. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात दलित पँथरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे…
पालम (प्रतिनिधी ) नुकत्याच झालेल्या पालकमंत्री निवडी बद्दल परभणी जिल्हा पालकमंत्री पदी विधानसभा 95 जिंतूरच्या कार्यकुशल नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची परभणी जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल दिनांक 19 जानेवारी 2024 रविवार रोजी पालम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पार्टी पालम तालुका पदाधिकारी यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव रोकडे,भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव दिवटे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लिंबाजीराव टोले,भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस बालाजी…
परभणी (प्रतिनिधी( देशाचे प्रसिद्ध तरुण आलिम-ए-दीन, शेर-ए-पंजाब, शाही इमाम, सदर-ए-मजलिस-ए-अहरार-ए-इस्लाम, मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांचे 26 जानेवारी 2025, रविवारी परभणी येथे आगमन होणार आहे. मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांच्या आगमनानिमित्त अल-खैर फाउंडेशन, परभणीच्या देखरेखीखाली दोन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहिला कार्यक्रम सकाळी 10 वाजता इफ्तिखार पार्क, धार रोड, परभणी येथे होईल. ही बैठक विशेषत: उलेमा, वकील, शिक्षक आणि इतर बुद्धिजीवींसाठी ठेवण्यात आली आहे. दुसरा कार्यक्रम साधी सभा स्वरूपात जुन्या ईदगाह मैदान, जिन्तूर रोड, परभणी येथे संध्याकाळी 7 वाजता आयोजित केला जाईल. या भव्य जनसभेचा विषय वक्फ आणि लोकशाहीचे संरक्षण असा आहे. या जनसभेचे अध्यक्षपद मौलाना कलंदर खान नदवी…
सेलू (प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा ची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून सेलू शहर राज्यातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद यांनी दिली आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील साई नाट्यमंदिरात राज्यातील 256 तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा तसेच राज्यात आदर्श काम करणाऱ्या तालुका व जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची निवड झाली असून त्यांनी या मेळाव्याच्या…
परभणी,(प्रतिनिधी( परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि सह – पालकमंत्री म्हणून नियुक्तीचा शासन निर्णय जारी केला. यादीनुसार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ***
परभणी, (प्रतिनिधी): स्वामित्व ही शासनाची महत्त्वाची योजना आहे. नागरिकांना दिलासा देणारी ही योजना असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या तंटयांची सोडवणूक होणार आहे. एकंदरीत नागरिकांचे आपापल्या मिळकतीचे वाद मिळालेल्या मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले. राज्य महसुल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग यांच्या संयुक्त विदयमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेव्दारे गावातील मिळकतधारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करुन देताना संबंधीत मिळकतधारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करत…

