परभणी,(प्रतिनिधी( परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि सह – पालकमंत्री म्हणून नियुक्तीचा शासन निर्णय जारी केला. यादीनुसार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
***


