Author: Lok Sanchar

चैतन्य प्रतिष्ठान परभणीच्यावतीने आयोजन परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील नांदखेडा रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालयात रविवार 26 जानेवारी ते मंगळवार 28 जानेवारी दरम्यान सांयकाळी सहा ते आठ या दरम्यान चैतन्य प्रतिष्ठान परभणी आयोजित श्रीमद्भगवतगीता भावदर्शन या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आल्याचे चैतन्य प्रतिष्ठानतर्फे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे होणार्‍या श्रीमद्भगवतगीतेवरील प्रवचनमालेसाठी यंदाच्या वर्षी गीतेच्या ज्ञानविज्ञानयोग या सातव्या अध्यायावर श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपुर यांचे निरुपण होणार आहे. कोविडच्या काळातील एक वर्ष वगळता मागील आठ वर्षांपासून अव्याहत चालू असणार्‍या या प्रवचनमालेत श्रीमद्भगवतगीतेच्या एक एका अध्यायाचे निरुपण प्रतिवर्षी करण्यात येत असते. प्रथमवर्षी संपूर्ण गीतेचे भावदर्शन झालेल्या या प्रवचनमालेच्या आयोजनासाठी परभणी शहरातील अनेक ज्येष्ठ नागरीकांनी त्रिंबकराव सुगावकर…

Read More

परभणी (प्रतिनिधी)  येथील रहिवासी व पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या रिया विकास मिश्रा हीने महाकुंभमेळा येथे रेखाटलेल्या वास्तुशिल्पाच्या प्रती कृतीबद्दल आ.डॉ.राहुल पाटील यांनी शनिवारी तिचा निवासस्थानी जाऊन सत्कार केला. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यातील जुना आखाडा श्री महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज यांच्यासाठी अनुष्ठान भवन, मुख्य मयुरेश्वर प्रवेशद्वार, भोजन कक्ष आदींचा आराखडा तयार करण्याचे काम रीया हीने यशस्वीरित्या पूर्ण केले. सध्या अहमदाबादच्या सारांश स्टुडिओ येथील चॅरिटी प्रोजेक्ट अंतर्गत इंटरनशिप करताना तिने या डिझाईन तयार केल्या आहेत. तिच्या या उल्लेखनीय कार्याचा आ.पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी तिचे वडील महावितरणचे…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसिलदार संदीप राजापुरे, गटविकास अधिकारी दीपा बापट आदींसह अन्य अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मतदार जनजागृतीवर विद्यार्थ्यांनी…

Read More

परभणी -(प्रतिनिधी)  परभणी व शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि 25) ,रोजी. बाबासाहेन आंबेडकर पुतळा परिसरात घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन करून यावेळी “ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव” व “एकच मिशन मतदाराच्या हक्काचे संरक्षण” अशी जोरदार घोषणा देत जनजागृती केली. जनतेच्या मताच्या हक्कावर झालेल्या हल्ल्याविरोधात काँग्रेस पक्षाने आवाज उठवला आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचा निर्धार केला. व मा. निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपुर्ण निवडणूकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण…

Read More

■डॉ.आसाराम लोमटे व डी. व्ही.मूळे मानकरी सेलू(प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यातील तालुका पत्रकार अध्यक्षांच्या मेळाव्यात परभणी जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार या मेळाव्यात करणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद हरिभाऊकाका बोराडे यांनी दिली आहे. या बाबत माहिती अशी की दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील 256 तालुक्यातील तालुका अध्यक्ष यांचा मेळावा तसेच आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागतादयक्ष असलेले माजी नगरादयक्ष विनोद बोराडे यांनी कार्यक्रमा संदर्भात बोलत होते . ते या वेळी पुढे म्हणाले की या मेळाव्याला सामाजिक न्याय मंत्री ना. संजय…

Read More

पालम (प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना सन 2019 ते 2020 अंतर्गत नवीन विहीर साठी निवड झाली होती यात लाभार्थीना दोन हप्ते मिळाले मात्र तिसरा हप्ता मिळाला नसल्याने पालम तहसिल कार्यालयासमोर दि. 24 जानेवारी रोजी डिग्रस, सिरसम येथिल लाभार्थी उपोषणास बसले आहेत. या लाभार्थीच्या विहीरीचे तिसरा हप्ताचे पुर्ण काम झाले आसुन या विहीरीचे बिल गेल्या पाचवर्षा पासुन दिले नाही. या शेतकऱ्यांच्या विहीरीचे फोटो देखिल काढून नेले आहेत. तिसरा हप्ता काढण्यासाठी इंजिनिअर आवळे हे 15 हजार रुपयाची मागणी करत आहेत. यांची मागणी शेतकरी पुर्ण करू शकत नसल्याने शेतकऱ्यांच्या विहीरी चा तिसरा हप्ता मिळाला नाही गेल्या कित्येक दिवसा पासुन हे लाभार्थी…

Read More

परभणी (प्रतिनिधी ) कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी वाड्.मय विभागाच्या वतीने आयोजित स्व.भारतभूषण रावसाहेबजी जामकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी ची अनुजा केरबा घुमरे ही प्रथम तर कुंडलिक घोटाळ द्वितीय क्रमांकाचा विजेती ठरली. कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी वाड्.मय विभागाच्या वतीने आयोजित स्व.भारतभूषण रावसाहेबजी जामकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रमुख वक्ते डॉ.राजशेखर सोलापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. किरणराव सुभेदार ( उपाध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था,परभणी ), उदघाटक हेमंतराव जामकर ( अध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था,परभणी.) यांची उपस्थिती होती.व्यासपीठावर प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले,उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार,वाड्.मय विभागाच्या…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : स्व. अ‍ॅड. शेषराव धोंडजी भरोसे यांच्या स्मृतीनिमित्त पाचव्यांदा संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा संयोजक आनंद भरोसे यांनी दिली. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन समारंभास आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भरोसे यांनी शुक्रवारी (दि.24) आयोजित केलेल्या पत्रकार परिषद दिली. यावेळी बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील यांची उपस्थिती होती. कृषी संजीवनी महोत्सवात निरनिराळे 6 दालन उभारण्यात…

Read More

सेलूत रक्तदान शिबिरात 300 जणांचे रक्तदान सेलू,(प्रतिनिधी) : रक्तदान शिबीरे ही काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच ती एक चळवळ झाली पाहिजे, त्यासाठी आपण सेलूत केमिस्ट भवनाच्या उभारणीसाठी सहकार्य करु, असे आश्‍वासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. अखिल भारतीय व महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त परभणी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अंतर्गत सेलू तालूका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने येथील साईनाट्य गृह परिसरात शुक्रवार 24 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी सौ. साकोरे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती दिनकर वाघ, डॉ. ऋतुराज साडेगावकर,…

Read More

पालम (प्रतिनिधी) पालम चे तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे वडील कै. विठ्ठलराव वाघमारे वय 79 वर्ष यांचे नादेड येथे दि. 22 जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. दि. 23 जानेवारी रोजी नांदेड येथील शांतीधाम गोवर्धन घाट येथे सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,मुली जावाई,नातू,पंतु असा मोठा परिवार आहे व पालमचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे ते वडील होते व जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यव्हारे यांचे ते सासरे होते. दैनिक लोकसंचार तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

Read More