पालम (प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना सन 2019 ते 2020 अंतर्गत नवीन विहीर साठी निवड झाली होती यात लाभार्थीना दोन हप्ते मिळाले मात्र तिसरा हप्ता मिळाला नसल्याने पालम तहसिल कार्यालयासमोर दि. 24 जानेवारी रोजी डिग्रस, सिरसम येथिल लाभार्थी उपोषणास बसले आहेत.

या लाभार्थीच्या विहीरीचे तिसरा हप्ताचे पुर्ण काम झाले आसुन या विहीरीचे बिल गेल्या पाचवर्षा पासुन दिले नाही. या शेतकऱ्यांच्या विहीरीचे फोटो देखिल काढून नेले आहेत. तिसरा हप्ता काढण्यासाठी इंजिनिअर आवळे हे 15 हजार रुपयाची मागणी करत आहेत. यांची मागणी शेतकरी पुर्ण करू शकत नसल्याने शेतकऱ्यांच्या विहीरी चा तिसरा हप्ता मिळाला नाही गेल्या कित्येक दिवसा पासुन हे लाभार्थी शेतकरी कार्यालयात चकरा मारत आहेत. नाईलाजाने या शेतकऱ्यांना तिसरा हप्ता न मिळाल्या मुळे दि. 24 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता तहसिल कार्यालया समोर शेतकरी गजानन रामा वावळे रा.डिग्रस, विठ्ठल व्यकंटी वाघमारे रा.सिरसम, निवृत्ती उखंडे वाघमारे रा.सिरसम यांनी निवेदन देऊन आमरण उपोषणास बसले आहेत या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी परभणी, कृषी विकास अधिकारी परभणी, गटविकास अधिकारी पंचायत समिती व पोलिस स्टेंशन पालम यांना देण्यात आले आहे.


