परभणी (प्रतिनिधी ) कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी वाड्.मय विभागाच्या वतीने आयोजित स्व.भारतभूषण रावसाहेबजी जामकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी ची अनुजा केरबा घुमरे ही प्रथम तर कुंडलिक घोटाळ द्वितीय क्रमांकाचा विजेती ठरली.

कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी वाड्.मय विभागाच्या वतीने आयोजित स्व.भारतभूषण रावसाहेबजी जामकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रमुख वक्ते डॉ.राजशेखर सोलापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. किरणराव सुभेदार ( उपाध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था,परभणी ), उदघाटक हेमंतराव जामकर ( अध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था,परभणी.) यांची उपस्थिती होती.व्यासपीठावर प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले,उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार,वाड्.मय विभागाच्या प्रभारी डॉ.आशा गीरी परिक्षक डॉ.निलेश लोंढे, डॉ.प्रविण लोणारकर, डॉ.संजय मोहाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना सोलापूरे म्हणाले की, रानात कसदार कणसं तशी समाजात विधायक विचार करणारी प्रामाणिक माणसं ही आज काळाची गरज बनली आहे.विधायक विचार विस्तारीत कसा होईल या साठीचा प्रयत्न युवाशक्ती ने करावा.आज सोशल मिडिया वरुन लोक मनात भेदभाव वाढीस लावण्याचे काम जोरात सुरू आहे,अशाने लोकशाही कशी टिकेल,या साठी प्रत्येक भारतीय नागरिकाने सजग राहात,मताधिकार बजावत, लोकहितवादी सरकार निवडत, लोकशाही बळकट करणे आजची गरज आहे.नसता हुकुमशाहीचा धोका अटळ असल्याचे अभ्यासपूर्ण मत सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.राजशेखर सोलापूरे यांनी स्व.भारतभूषण रावसाहेबजी जामकर स्मृती राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी वाड्.मय विभागाच्या वतीने आयोजित स्व.भारतभूषण रावसाहेबजी जामकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.राजशेखर सोलापूरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड. किरणराव सुभेदार ( उपाध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था,परभणी ), उदघाटक हेमंतराव जामकर ( अध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था,परभणी.) यांची उपस्थिती होती.व्यासपीठावर प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले,उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार,वाड्.मय विभागाच्या प्रभारी डॉ.आशा गीरी परिक्षक डॉ.निलेश लोंढे, डॉ.प्रविण लोणारकर, डॉ.संजय मोहाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
स्व.रावसाहेबजी जामकर स्व.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून, महाविद्यालय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.हेमंतराव जामकर यांच्या हस्ते डॉ.राजशेखर सोलापूरे यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
एक देश एक निवडणूक हा विषय चर्चिला जावा, युवा स्पर्धकांना अधिक सक्षम आणि वास्तवाचे भान देणारे परखड विचार मांडता यावेत यासाठी हा विषय ठेवण्यात आला असून या साठी माझ्याकडून शुभेच्छा. स्पर्धकांनी आपली अभ्यासपूर्ण मत मांडावीत असे आवाहन प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी केले.
वक्तृत्व हे साध्य नसून साधन आहे.शब्दांचा तो एक प्रवास असून शब्द पाझरत,झाडाला सहज पालवी फुटावी तसे प्रसंगावधान राखत विषयाची मांडणी हे वक्तृत्वाच लक्षण लक्षात घेत वक्त्यान स्वत: च मत मांडत ते श्रोत्यांना पटवून द्यावे,असे प्रतिपादन डॉ.राजशेखर सोलापूरे यांनी केले.
स्पर्धक क्रमांकाची चिठ्ठी उदघाटक हेमंतराव जामकर यांचे हस्ते काढत स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.प्रसंगी हेमंतराव जामकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा ही दिल्या.
राजशेखर सोलापूरे सरांनी वक्ता आणि वकृत्व या विषयी माहिती देत.आदर्श वक्तृत्व कसे असावे या विषयी दिलेल्या टीप्स स्पर्धकांसाठी बहुमोलाच्या असल्याचे मत मांडत स्पर्धकांना अध्यक्षीय समारोपात ॲड.किरणराव सुभेदार यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी ची अनुजा केरबा घुमरे ही प्रथम क्रमांकाची विजेती ठरली सन्मान चिन्ह, सन्मानपत्र ५०००रु हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वारातीम विद्यापीठ नांदेड भौतिकशास्त्र विद्या संकुल चा कुंडलिक तुकाराम घाटोळ याला सन्मानचिन्ह सन्मानपत्र रोख ३००० हजार रुपये, नागनाथ महाविद्यालय,औंढा नागनाथ येथील योगिता संतोष राऊत हिने तृतीय पारितोषिक पटकावले रोख २००० रु. सन्मान चिन्ह,सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक श्री. शिवाजी महाविद्यालय परभणी चे किशन शिवाजी जाधव आणि आदिनाथ हनुमानराव काळबांडे यांना प्रत्येकी १००० रु. सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सदरील पारितोषिके महाविद्यालयाच्या उपप्राचार्य संगीता आवचार,परिक्षक डॉ.प्रविण लोणकर, डॉ.निलेश लोंढे, डॉ.संजय मोहाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार, डॉ.आशा गिरी, डॉ.संगीता लोमटे, डॉ.ओमप्रभा लोहकरे , डॉ.नसिम बेगम, डॉ.अभिजित सरनाईक प्रा.महेश जाधव,प्रा.निर्मला जाधव,प्रा.अरुण पडघन , काशीराम कानकुडकेवार, ज्ञानेश्वर रेंगे,पठाण याकूब खान यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा गीरी यांनी केले .


