परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचे भूमीपुत्र रामराव वडकुते यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल परभणीकरांच्या वतीने येत्या रविवारी 12 एप्रिल रोजी परभणीत भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी सत्कार समितीच्या पदाधिकार्यांनी शनिवार 4 एप्रिल रोजी एका पत्रकार परिषदेतून दिली.
माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, अॅड. स्वराजसिंह परिहार, किर्तीकुमार बुरांडे, राजेंद्र वडकर यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी शनिवारी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेतून खासदार वडकुते यांची राज्य सभेवरील निवड ही परभणीकरांच्या दृष्टीने सार्थ अभिमानाची बाब आहे, असे नमूद केले. आपल्या माणसाचा आपल्याच माणसांनी गौरव केला पाहिजे, या भावनेतून समस्त परभणीकरांच्या वतीने 12 एप्रिल रोजी रविवारी एमआयडीसीतील हॉली डे फन पार्कच्या लॉनवर सायंकाळी 6 वाजता हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
या सोहळ्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याहस्ते खासदार वडकुते यांचा सत्कार करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार सुरेश दादा देशमुख, माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे, माजी खासदार डॉ. फौजिया खान, माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार विजयराव भांबळे व महापौर सय्यद इकबाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भगवानराव वाघमारे, अॅड. स्वराजसिंह परिहार, भिमराव हत्तीअंबीरे, किर्तीकुमार बुरांडे, प्रमोद वाकोडकर, विठ्ठलराव रबदडे, विजय वरपुडकर, तुकाराम साठे, संतोष मुरकुटे, चंद्रकांत बोकन, नानासाहेब राऊत, अशोकराव लवटे, अभय कुंडगीर, चंद्रकांत डहाळे, विशाल बुधवंत, विष्णू कुटे, राजेंद्र वडकर, प्रविण देशमुख, आसाराम लोमटे, संतोष धारासूरकर, रमेश गोळेगांवकर, प्रल्हादराव चिंचाणे, मुंजाभाऊ गायकवाड, भारत आव्हाड व अनंता बनसाडे यांनी केले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


