पालम (प्रतिनिधि) राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत लाभार्थी यांना अर्थसहाय्य वितरण जानेवारी २०२५ पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन स्तरावरून डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तहसीलमध्ये सादर करण्याचे अवाहन पालम चे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी केले. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी यांनी आधार कार्ड, बँकेशी संलग्न मोबाइल नंबर,बँक पासबुक,हयात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला याबाबत आवश्यक कागदपत्रे संबंधित गावातील तलाठी किंवा संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावीत. तसेच,आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे,ज्या लाभार्थ्यांनी वरील कागदपत्र सादर केली नाहीत, त्यांचे निवृत्ती वेतन…
Author: Lok Sanchar
पूर्णा (प्रतिनिधी)स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठक घेऊन आंदोलन करण्याचे ठरवले अखेर दिनांक 18 जानेवारी रोजी ठीक 11 वाजता धानोरा काळे फुलावर जल समाधी आंदोलना ला सुरूवात झाली. हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने एक तास चर्चा केली पण तोडगा निघाला नाही.अखेर ठाम भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीपात्रात उड्या मारून जलसमाधी आंदोलनाला सुरूवात केली जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन, कापुस, मुग, उडीद यांन सारखे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाने पंचनामे पुर्ण केले जिल्ह्यातील सर्वच महसुलमंडळ अग्रिम रक्कमेस पात्र ठरली. असुन देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या…
गंगाखेड:(प्रतिनिधी) भारतासाह आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी लढा उभारणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने रविवार १९ जानेवारी रोजी गंगाखेड शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांच्यासह राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पत्रकारांना पत्रकारिता करत आसतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पत्रकारांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या कोण सोडवणार असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मात्र त्याच्या समोर कोणताच पर्याय दिसत नाही. कायम खिशात विस्तव घेवुन फिरणाऱ्या पत्रकाराच्या सुरक्षेसाठी कुठलीच उपाय योजना…
सेलू (प्रतिनिधी) येथील राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष मेळाव्याचे उदघाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार सेलू/ प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या सेलू येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी दिली आहे. या बाबत माहिती अशी की दिनांक 1 फेब्रुवारी 25 रोजी सेलू येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा व राज्यातील 256 तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा येथील साई नाट्य मंदिरात होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी व सेलू येथील पत्रकारांनी…
परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या विविध शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिराचे रविवारी (दि. 19) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा मैदान, कळमनुरी जि. हिंगोली येथे सकाळी साडेनऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर आणि हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य…
चाटोरी येथे विवेकानंद शाळेत पालक मेळावा पालम ( प्रतिनिधी) अलीकडील काळात मुलं परावलंबी होताना दिसत आहेत.त्यांना श्रमाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे. त्यांच्यात शिस्त निर्माण करून संस्काराचे बाळकडू लहानपणापासूनच दिली गेले पाहिजेत. प्रत्येक आईने आपलं मूल स्वावलंबी कसं होईल यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्रा.डॉ. शकुंतला जवंजाळ यांनी केले. पालम तालुक्यातील चाटोरी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्याने माता पालक मेळाव्याचे आयोजन दि.16 रोजी केले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष सुभाष ढगे, उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदीप किरडे हे उपस्थित होते. यावेळी प्रा.राम कऱ्हाळे,संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डी.बी.पवार,प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश…
सेलू (प्रतिनिधी) युवकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही लोकशाही मुल्य आपल्या जीवनात आचरणात आणावीत. यामुळे लोकशाही बळकट होईल. सोबतच युवकांचे भविष्यही उज्ज्वल होईल. असे प्रतिपादन नूतन विद्यालयातील सहशिक्षक डॉ. सुरेश हिवाळे यांनी काजळी रोहिणा येथे आयोजित नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात शुक्रवार ( दि. १७ ) रोजी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश कुलकर्णी हे होते. नूतन महाविद्यालयाचे काजळी रोहीणा येथे ‘ युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी ‘ हा विषय असलेले राष्ट्रिय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश हिवाळे यांचे ‘ लोकशाही मुल्य संवर्धनात युवकांची भुमिका ‘…
परभणी,(प्रतिनिधी) आर पी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथे टीबी स्क्रीनिंग सेंटर व फिजिओथेरपी शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आ. डॉ.राहुल पाटील, ज्येष्ठ विधीतज्ञ अशोक सोनी, डॉ. विवेक नावंदर, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्रुबा घाडगे,संदीप भंडारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी डॉ. संजय हरबडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक विठ्ठल रणबावरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. किरण सगर, प्रा. डॉ. संतोष हरकळ, डॉ. जयदेव उघडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री दर्डा म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम डॉ.राहुल पाटील आणि आरपी हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून सुरू आहे, मेडिकल कॉलेजच्या…
परभणी (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये परभणी उत्तर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे उत्तर कार्यकांनी जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी गणेश गाढे महासचिवपदी पवन वाकडे उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान अन्वर खान उपाध्यक्ष अखिल मिश्रा उपाध्यक्ष रमेश लोखंडे सचिवपदी रविराज बनसोडे, बालासाहेब गाडे सहसचिव पदी कपिल कांबळे, सुबोध कुमार बनसोडे कोषाध्यक्षपदी मिलिंद खंदारे संघटक पदी राहुल कांबळे किरण भगत, संविधान वायवळ अजय वायवळ, प्रसिद्धी प्रमुख पदी दिलीप बोरकर सदस्य पदी शेख चांद शेख एजाज, आकाश सरोदे, मिलिंद वाकडे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल परभणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार…
परभणी ( प्रतिनिधी )वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ दिनांक २३ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला असुन दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णन हे भुषविणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री माणिकराव कोकाटे हे दीक्षांत समारंभास सन्मानित अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दीक्षांत समारंभास खडगपूर येथील भारता पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकित कृषि अभियंता तथा माजी संचालक मा. प्रा. विरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहुन दीक्षांत अभिभाषण करणार…

