परभणी (प्रतिनिधी) भीमा कोरेगाव विजय दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामंतर दिनाच्या निमित्ताने धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने रविवार १९ जानेवारी रोजीशहीद सोमनाथ सूर्यवंशी विचार मंच, स्मृतिशेष विजय वाकोडे नगरी बी रघुनाथ सभागृह येथे शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा आयोजित केला आहे. व्याख्यान,सांस्कृतिक प्रबोधन व नामांतर योद्धा पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सकाळी ११:३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन धम्मदुत डॉ सिद्धार्थ हत्तीअंबीरे (प्रदेशाध्यक्ष काँग्रेस अनु जाती विभाग) यांच्या हस्ते होणार असून मुंबई येथील प्रख्यात व्याख्याता सुरेखा पैठणे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलंकृता कश्यप बगाटे (अप्पर कोषागार अधिकारी नांदेड)…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षण विभागाला अंधारात ठेऊन परभणीतील शिक्षण संस्था आर टी ई २५% मधील पूर्व प्राथमिकचे तीन वर्ग वगळल्या जात आहेत.तातडीने पूर्व प्राथमिक तीनही वर्गाचा समावेश करावा या मागणीचे निवेदन दिले.मागणी मान्य न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना परभणीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक यांनी प्राथमिक शिक्षण विभाग, जि.प. परभणीचे , शिक्षणधिकारी यांना निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिक्षण विभागाला अंधारात ठेऊन परभणीतील शिक्षण संस्था आर टी ई २५% मधील पूर्व प्राथमिकचे ३ वर्ग वगळत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. शासन परिपत्रकानुसार आर टी ई २५% अंतर्गत प्रवेश…
परभणी,( प्रतिनिधी) संविधान सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन तत्त्वे वेगळी नाहीत. या तिघांच्या मिळून एक संघ आहे या तिघांची एक त्रिगुणात्मक मूर्ती आहे. ती एकमेकापासून अलग करण्याच्या प्रयत्न केला तर लोकशाहीचा मूळ हेतू नष्ट होईल. या देशातील चार्वाक, बुद्ध, कबीर, महावीर, तुकोबाराया, शाहू महाराज, शिवराय, महात्मा फुले, यांचा समता मुलक वारसा पुढे चालवीत जगातील सर्वात मोठे राज्यघटना देशाला बहाल केली. आधुनिक भारताला त्यांनी समितीच्या धाग्यात गोखले त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय संविधान सामाजिक समतेचा परिपाक होय असे प्रतिपादन डॉ. रमेश शिंदे यांनी केले. विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व…
परभणी,(प्रतिनिधी) : सहावा वेतन आयोग लागू करावा यासह रखडलेल्या अन्य मागण्यांकरीता परभणी व हिंगोली जिल्हा गटसचिव कर्मचारी संघटनेच्या संतप्त सदस्यांनी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 6 जानेवारीपासून धरणे व बेमुदत आंदोलन सुरु केले असून मंगळवार 14 जानेवारी रोजी म्हणजे आठव्या दिवशीही हे आंदोलन सुरुच आहे. संगणकीकरण संस्थांना लागणारा खर्च, विद्युत बिल, वायफाय कनेक्शन, रिचार्ज, टेबल-खूर्ची व अन्य खर्च गट सचिवांना मिळणार्या 17 ते 22 हजार पर्यंतच्या वेतनातून भागत नाही, त्यामुळे संगणीकरण संस्थांना कामकाजाबाबत वार्षिक खर्चाची तरतूद करुन प्रत्येक महिन्याला सदचा खर्च देण्याचे प्रयोजन करावे, सचिवांना लातूर पॅटर्नप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, 2023 ला ताळमेळ केलेल्या संस्थेला देवू केलेल्या खर्चासाठी परसंस्था…
परभणी (प्रतिनिधी) भारत हा युवकांचा देश आहे इथल्या युवक युवतीने आपले ध्येय शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करावेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याचे कणखर माध्यम शिक्षण हेच आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व भडक मार्गाच्या नादी न लागता शाश्वत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे. इतर चंगळ मार्गाकडे न वळता सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कलागुणांना अधिकाधिक गतिमान करावेत. तेव्हाच सर्वांगीण विकास होईल. आजच्या विद्यार्थ्यांनी डिजिटल युगाकडे अधिक प्रमाणात वेळ खर्च करू नये. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यापेक्षा समाज गाव आणि राष्ट्रहितासाठी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व विकसित करावे असे प्रतिपादन कविता नावंदे निंबाळकर(जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी) यांनी केले स्वामी रामानंद…
पालम (प्रतिनिधी) रोजी पालम भारतीय जनता पार्टी पालम मंडळाच्या वतीने दुष्काळी अनुदान व अग्रीम पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करणे बाबत यासाठी पालम ना. तहसीलदार राजेश्वर पवळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव रोकडे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव दिवटे,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रुपेश शिनगारे,बालाजी बरडे,भास्कर कराळे, धारबा कापसे, तुकाराम कराळे, मधुकर रोकडे, भिमाशंकर सोनवळे,रामजी गावंडे,काशिनाथ भंडारवाड,वैजनाथ राऊत,गोविंद इंगळे, निवृती सारोळे,शंकर चलवाड,हनुमान देशमुख,दता कदम, शंकर कदम, बालाजी साखरे, आत्माराम चाळक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
परभणी ( प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर पुळ्यासमोर नामविस्तार दिन सकाळी ठिक 10ः30 वा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सुरुवातीस तथागत भ. बुध्द यांच्या मुर्तीचे पुजन करुन भंते पी, धम्मानंदजी विश्वनाथ झोडपे, रामचंद्र रोडे यांच्या हस्ते डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करण्यात आला. भंते पी. धम्मानंदजी यांनी उपस्थितांना ञिसरण पंचशील दिले. कार्यक्रमाचे सुञसंचलन तालुका अध्यक्ष एम. एम. बरे यांनी केले. नामांतर लढ्यातील जेष्ठ नेत्या राणुमाय वायवळ व रामचंद्र रोडे यांनी नामांतर लढ्याचा ईतिहास सांगीतला. यावेळी प्रमुख उपस्थितीत भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले यांच्यासह जिल्हासरचिटणीस डि.…
• एआय तंत्राचाही वापर* *• नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर* मुंबई, : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. प्रधान सचिव तथा महासंचालक श्री.…
पालम ( प्रतिनिधी ) वकील संघाची नुतन 2025 ची कार्यकारणी घोषित करण्यात आली आसुन या वेळी पालम वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड व्ही.डी शिंदे व उपाध्यक्षपदी ॲड बी बी दुधाटे साहेब तसेच सचिव ॲड .एस आर रोकडे व सहसचिव पदी ॲड ए एस डुकरे कोषध्यक्षपदी ए. आर. कुलकर्णी मॅडम ग्रंथपाल ॲड एस एस. बी. ढोले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात करण्यात करण्यात आली. या निवडीबाबत वकील संघातील सर्व ज्येष्ठ जेष्ठ विधीतज्ञ ॲड जी यु अळनुरे व ॲड.व्ही.ए.गिनगिने ॲड जी.आर. पौळ.ॲड आर.यू. मोहळकर.ॲड एफ. डब्लू. शेख.ॲड टी. एम. पौळ.ॲड व्ही. एस. जुंजारे.ॲड मुठाळ.ॲड यू.ए. सिरस्कर.ॲड दुर्गादास कुकडे.ॲड के. बी.जूजारे.ॲड ए. एम. खतीब…
परभणी,(प्रतिनिधी) पाथरी रस्त्यावरील आर.पी.हॉस्पिटल येथे एक जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे,या शिबिरात बारा दिवसात दहा हजार जणांची तपासणी केली.रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहून 31 जानेवारीपर्यंत हे शिबिर सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार बळावत आहेत, यामध्ये हृदयरोग आजाराचे प्रमाण वाढत आहे.तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे, या आजाराचे धोके ओळखून लवकर निदान व उपचार केल्यास संबंधित आजाराचे प्रमाण व मृत्यू रोखता येतो ही गरज ओळखून आ. डॉ.राहुल पाटील यांनी आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दिनांक…

