पालम (प्रतिनिधी) रोजी पालम भारतीय जनता पार्टी पालम मंडळाच्या वतीने दुष्काळी अनुदान व अग्रीम पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करणे बाबत यासाठी पालम ना. तहसीलदार राजेश्वर पवळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव रोकडे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव दिवटे,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रुपेश शिनगारे,बालाजी बरडे,भास्कर कराळे, धारबा कापसे, तुकाराम कराळे, मधुकर रोकडे, भिमाशंकर सोनवळे,रामजी गावंडे,काशिनाथ भंडारवाड,वैजनाथ राऊत,गोविंद इंगळे, निवृती सारोळे,शंकर चलवाड,हनुमान देशमुख,दता कदम, शंकर कदम, बालाजी साखरे, आत्माराम चाळक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


