Author: Lok Sanchar

परभणी ( प्रतिनिधी) येथील बेलेश्वर महाविद्यालय चे संचाकक संतोष बप्पा अंधारे यांचे आज दि. 13 रोजी सोमवार रोजी दुपारी 12 वाजता उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समय ते 48 वर्षाचे होते हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या दिनांक 14 रोजी मंगळवारी सकाळी ठीक 8.00 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी पाईप कारखान्याच्या बाजूला दर्गा रोड परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात आई भाऊ बहीण एक मुलगा मुलगी पत्नी काका काकू असा मोठा परिवार आहे अंधारे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंख्या परिवार सहभागी आहे

Read More

पालम (प्रतिनिधी) अखिल भारतीय सकल ब्राह्मण समाज तथा सर्व शाखीय ब्राह्मण समाज गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष संजय कुलकर्णी सुपेकर यांच्या संकल्पनेतुन शास्त्रशुद्ध पद्धतीने दिनदर्शिका 2025 उपस्थित सर्वांना मोफत स्वरूपात देण्याचा संकल्प करत दि.10 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता पालम येथे श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा तथा श्री शनी महाराज देवघर येथे यथोचित दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संजय कुलकर्णी, सुपेकर शाम कुलकर्णी,राजेंद्र पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाषकाका पत्की, लिंबाजीराव टोले, तुकाराम मोहिते, इंद्रजीत सराफ, डिगांबर घोरपडे, किशोर घोरपडे, गोविंद घोरपडे, चौरेकाका,सुरेश पौळ,मिटूदेवा देशपांडे, संतोष जोशी, तुकाराम ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यात आला यावेळी मिटूदेवा देशपांडे यांनी…

Read More

सेलू (प्रतिनिधी) मराठी मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या सेलू येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्यास सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाट हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी दिली आहे या बाबत माहिती अशी की दिनांक दिनांक 1 फेब्रुवारी 25 रोजी सेलू येथील साई नाट्य मंदिर येथे राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अद्यक्ष यांचा मेळावा व आदर्श तालुका संघ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण काल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष…

Read More

परभणी ( प्रतिनिधी( जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद आणि माँ जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. युवा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा या प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या कार्यक्रमाकरीता कविता नावंदे (जिल्हा क्रीडा अधिकारी), नानकसिंग बस्सी (क्रीडा अधिकारी) संजय मुंढे (क्रीडा मार्गदर्शक) रोहन औढेंकर (क्रीडा अधिकारी) रमेश खुणे (वरिष्ठ लिपीक) धनंजय बनसोडे (सचिव बॉक्सींग असो.) प्रदिप लटपटे (जिम्नॅस्टीक असो.) प्रकाश पंडित (बास्केटबॉल असो.) यांची उपस्थीती होती. कविता नावंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर जिम्नॅस्टीक, बॉक्सींग आणि बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व या स्पर्धेकरीता खेळाडुंनी मोठया उत्साहाने सहभाग नोदवला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कार्यालयातील धिरज…

Read More

परभणी (प्रतिनिधी) येथील वसमत रोड वरील शिवशक्ती अपार्टमेंट समोर उभी असणारी, तुलसी उपहारगृहासमोरील मातोश्री वडापाव स्टाँलवरील दोन गॅस सिलेंडरचा शनिवारी मध्यरात्री एका पाठोपाठ दोन मोठे स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अधिक माहिती अशी की, मातोश्री वडापावचा स्टॉल प्रसिद्ध आहे. नेहमीप्रमाणे गाड्याच्या मालकाने रात्री काम आटपून घरी गेला. परंतु रात्री 12.30च्या सुमारास या गाड्या मधील एका सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू गेला. वसमत रस्त्यावर लांबपर्यंत हे आगीचे लोळ दिसत होते. त्यावेळी परिसरात असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने अग्निशामक दलास ती बाब कळवली. मात्र त्या आधीच दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला.…

Read More

परभणी (प्रतिनिधी) मानवी जीवनात सेवाभाव अतिशय महत्त्वाचा असून तो प्रत्येक माणसांनी अंगी रूजवला पाहिजे. जनसेवा हिच ईश्वर सेवा हा विचार स्वीकारून प्रत्येकाने जनसेवेचा वसा घेतला पाहिजे. ही जनसेवा वेगवेगळ्या पध्दतीने करता येते. त्यामध्ये रक्तदान ही सुद्धा सर्वश्रेष्ठ जनसेवा आहे. ज्यामुळे अनेकांना जीवदान देता येवू शकते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे ब्राम्हणगाव ता.जि.परभणी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात जवळपास नव्वद व्यक्तीची विविध रोगनिदान व नेत्रतपासणी डॉ. विजयसाई शेळके, डॉ. अरूण लांडे, श्री. जुमडे साहेब…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 12 ते 26 जानेवारी दरम्यान भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते व आयुष अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर वडमिलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाच्या प्रांगणात नियोजना करिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निरामय योग केंद्राचे अध्यक्ष डॉ. राहुल झांबड, आरोग्य वर्धिनीचे योग प्रशिक्षक गजानन चौधरी, सचिन रायपत्रीवार, सुंदरदास मोरे,…

Read More

परभणी ( प्रतिनिधी) पक्ष्यांना स्वतःची भाषा असते. पक्षी हे माणसाचे मित्र असतात. ते मानवाला नेहमीच मदत करत असतात. पक्ष्यांना दुःख , वेदना , सुख याची जाणीव होणारी भाषा समजत असते. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट करण्यापेक्षा त्याचे संवर्धन करण्यासाठी मनुष्यांनी संवर्धक झाले पाहिजे. त्यासाठी पक्ष्यांच्या बाबतीत आपण नेहमी संवेदनशील असले पाहिजे.* असे प्रतिपादन पक्षीमित्र माणिक पुरी यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठान , परभणी व बाल विद्यामंदिर हायस्कूल , वैभव नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व्याख्यानमालेत माणिक पुरी *पक्षी येती अंगणी* या विषयावर बोलत होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अरुण बोराडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर जिजाऊ ज्ञानतीर्थची बालव्याख्याती कु. स्नेहल निलवर्ण व…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे आज शुक्रवार (दि. 10) रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण, श्रीमती देवकुळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, संगीता सानप, जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांची उपस्थिती होती. सर्व तहसिलदार, नायब तहसीलदार, संघटनाचे पदाधिकारी, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसुल अधिकारी, शिपाई, महसुल सेवक यांचा…

Read More

श्री सद्गुरू दाजी महाराज यांचा 165 वा जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव दि.2 ते 14 जानेवारी या कालावधीत पूर्णा (प्रतिनिधी( श्री सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव या निमित्ताने काल दि.9 जानेवारी ,गुरुवार रोजी श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य हंपी विरूपाक्ष , हम्पीपीठ यांचे श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे आगमन झाले. भारतीय संस्कृतीनुसार त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजी महाराज यांचा 165 वा जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव दि.2 ते 14 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहेत. पूर्वार्धात ऋग्वेद संहिता पद क्रम पाठ षडंगसहित पारायण पूर्ण झाले.उत्तरार्धात भागवतभूषण…

Read More