परभणी ( प्रतिनिधी) येथील बेलेश्वर महाविद्यालय चे संचाकक संतोष बप्पा अंधारे यांचे आज दि. 13 रोजी सोमवार रोजी दुपारी 12 वाजता उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समय ते 48 वर्षाचे होते
हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या दिनांक 14 रोजी मंगळवारी सकाळी ठीक 8.00 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी पाईप कारखान्याच्या बाजूला दर्गा रोड परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात आई भाऊ बहीण एक मुलगा मुलगी पत्नी काका काकू असा मोठा परिवार आहे अंधारे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंख्या परिवार सहभागी आहे


