पालम (प्रतिनिधी) अखिल भारतीय सकल ब्राह्मण समाज तथा सर्व शाखीय ब्राह्मण समाज गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष संजय कुलकर्णी सुपेकर यांच्या संकल्पनेतुन शास्त्रशुद्ध पद्धतीने दिनदर्शिका 2025 उपस्थित सर्वांना मोफत स्वरूपात देण्याचा संकल्प करत दि.10 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता पालम येथे श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा तथा श्री शनी महाराज देवघर येथे यथोचित दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी संजय कुलकर्णी, सुपेकर शाम कुलकर्णी,राजेंद्र पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाषकाका पत्की, लिंबाजीराव टोले, तुकाराम मोहिते, इंद्रजीत सराफ, डिगांबर घोरपडे, किशोर घोरपडे, गोविंद घोरपडे, चौरेकाका,सुरेश पौळ,मिटूदेवा देशपांडे, संतोष जोशी, तुकाराम ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यात आला यावेळी मिटूदेवा देशपांडे यांनी सूत्र संचलन केले त्यावेळी सर्वांच्या वतीने सवत्स गोपुजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व सर्वांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम चे सचिव अविनाश देविदासराव जोशी पालमकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले


