परभणी (प्रतिनिधी) येथील वसमत रोड वरील शिवशक्ती अपार्टमेंट समोर उभी असणारी, तुलसी उपहारगृहासमोरील मातोश्री वडापाव स्टाँलवरील दोन गॅस सिलेंडरचा शनिवारी मध्यरात्री एका पाठोपाठ दोन मोठे स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अधिक माहिती अशी की, मातोश्री वडापावचा स्टॉल प्रसिद्ध आहे. नेहमीप्रमाणे गाड्याच्या मालकाने रात्री काम आटपून घरी गेला. परंतु रात्री 12.30च्या सुमारास या गाड्या मधील एका सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू गेला. वसमत रस्त्यावर लांबपर्यंत हे आगीचे लोळ दिसत होते.

त्यावेळी परिसरात असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने अग्निशामक दलास ती बाब कळवली. मात्र त्या आधीच दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळेही वसमत रस्ता या आवाजाने हादरून गेला.अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.


