परभणी,(प्रतिनिधी) : तालुक्यातील दैठणा येथे धावत्या बसने अचानकपणे पेट घेतला. परंतु, चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी थांबवली व प्रवाशांना तातडीने खाली उतरवून ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गंगाखेडहून परभणीला जाणार्या या बसमध्ये 30 प्रवासी होते. ही बस दैठणा येथे किनारा बारच्या जवळ आली असता बसला अचानकपणे आग लागली. ही बाब लक्षात येताच चालकाने स्वत: खाली उतरून सर्व प्रवाशांना बस रिकामी करण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने आवाज देताच ग्रामस्थांनी दुचाकीवरून पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांसह काही प्रवाशांनी देखील मदत केल्यामुळे ही आग विझली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचे प्राण वाचले. ( छाया उत्तम बोरसुरीकर)
Author: Lok Sanchar
बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा परभणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मटकर्हाळा ते आनंदवाडी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उध्दव गरुड, शहर चिटणीस वैभव संघई, मटकर्हाळा शाखा प्रमुख माऊली गरुड, प्रकाशराव गरुड, संतोषराव गरुड, प्रल्हाद गरुड, संतोष गरुड, सुरेश उत्तमराव गरुड आदींच्या एका शिष्टमंडळाने गुरूवारी (दि.9) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आपल्या मागणी संदर्भातील निवेदन सादर केले. त्यातून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एप्रिल-मे 2024 ला तालुक्यातील मटकर्हाळा ते आनंदवाडी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. हे काम करतांना कंत्राटदाराने या…
रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन : 31 जानेवारीपर्यंत अभियन परभणी, (प्रतिनिधी):- मानवी जीवन मूल्यवान आहे, त्यामुळे रस्त्यावरुन वाहन चालविताना सुरक्षितपणे वाहन चालवा. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघात व अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. जबाबदार व्यक्ती म्हणून सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करा आणि वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी केले. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आज रस्ता सुरक्षा अभियान-2025 चे थाटात उदघाटन झाले. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी (नांदेड) विनय अहिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवाड, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, तडवी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष…
परभणी ( प्रतिनिधी) पथविक्रेता समिती करिता झालेल्या निवडणुकीतून नवनियुक्त सदस्य तसेच शासकीय सदस्य, अशासकीय सदस्य यांची एकत्रित नगरपतविक्रेता समितीची पहिली बैठक आज आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगर सचिव विकास रत्नपारखे पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, बँक प्रतिनिधी जितेंद्रसिंह कुशवाह, नगर रचनाकार चंद्रकांत वडेकर, आरोग्य विभागाचे डॉक्टर कल्पना सावंत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वप्रथम सर्व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन महानगरपालिकेतर्फे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी स्वागत केले. यानंतर नगर पथक्रेता समितीचे कार्य काय आहेत व शासन अधिनियमानुसार कर्तव्य जबाबदाऱ्या यांची सखोल माहिती आयुक्त धैर्यशील जाधव यांनी सर्व सदस्यांना करून दिली. यावेळी सदर समितीचे कामकाज…
परभणी (प्रतिनिधी) आज शाळा महाविद्यालयासाठी विद्यार्थी महत्वाचा केंद्र बिंदु आहे. हाच देशाचा पाया आहे. कोणत्याही देशाची सशक्त जड़न-घड़न शाळा महाविद्यालय तयार होत असते. त्या साठी मानसिक आरोग्य महत्वाचे असते, शारीरिक व बौद्धिक मानसिक आरोग्य हे प्रत्येक व्यक्ति ची महत्वाची संपत्ती आहे. इतर संपत्ती पेक्षा सक्षम आरोग्य महत्वाचे आहे. त्यासाठी वाचन चिंतन आणि लेखन हेच विद्यार्थ्यांचे मानसिक सक्षमतेसाठी व जीवन सुंदरते साठी सतत प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्रा. डॉ. नवनाथ सिंगापुरे यानी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे ब्राह्मणगांव इथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराच्या दूस-या दिवसाच्या दुपारच्या बौद्धिक…
पालम (प्रतिनिधी) इदापूर येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. यात परभणी जिल्हा कार्यकारणी घोषीत करण्यात आली आहे.महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक आघाडी जिल्हा अध्यक्षपदी माधव निवृतीराव हत्तीआंबिरे पालमकर यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हाउपाध्यक्ष कपिल पांडुरंग हत्तीआंबिरे,जिल्हा सचिव शेख सलमान, जिल्हा महासचिव तुषार तानाजी पंडित, जिल्हा संघटक वसंत मस्के व सटवाजी थिटे यांची निवड करण्यात आली यावेळी समाज कार्यकृते विलास गेंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी,आकास कस्तुरे,राहुल ससाने, गौरव शेळके आदि उपस्थित होते हि निवड महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी एका नियूक्ती पत्रा द्वारे केली आहे. या पत्रात पक्ष व पक्षश्रेष्ठीनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून शिस्तीचा आदर्श जोपासावा,…
महाविहाराच्या जागेवर ५० फूट उंचीच्या धम्म ध्वजाचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न. परभणी (प्रतिनिधी) जागतिक धम्म ध्वज दिनानिमित आज ८ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी ११ वाजता इंद्रायणी माळ, मौजे डफवाडी- मांडाखळी परिसरात पहिल्यांदाच नियोजित महाविहाराच्या १० एकर जागेवर ५० फूट उंचीच्या धम्म ध्वजाचा ध्वजारोहण प्रतिष्ठापना सोहळा धम्ममय वातावरणात पार पडला. थायलंड येथील भदंत फ्रा. पट्टरघुन कृदांग ,यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या सोहळ्याचे आयोजन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अध्यक्ष आश्रय सेवाभावी संस्था तथा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग यांनी केले होते. या सोहळ्यास सिने अभिनेते डॉ. गगन मलीक, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पूर्णा, भदंत मुद्दीतानंद थेरो, भदंत मोगलायन ,भंते धम्मघोष, भदंत चंद्रमणी ,भंते धम्मकिर्ती,…
परभणी ( प्रतिनिधी) दुधगांव महसुल मंडळातील शेतकऱ्यांना भावांतर योजने अंतर्गत सोयाबीन व कापुस या पिकांस हेक्टरी 5000 अनुदान अद्याप पर्यंत प्राप्त झाले नाही अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे तसेच खरिप-2024 अग्रीम पिक विमा मिळणे व तसेच 2021 व 2023 खरिप व रब्बी चा पिक विमा मिळावा या व अन्य मागणीसाठी दुधगांव महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी आज दिनांक 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. लवकरात लवकर पिक विमा देव्याचे आदेशित करावे अन्यथा लोकशाही मार्गाने दि. 24/01/2025 पासून मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात दुधगांव महसुल मंडळातील शेतकरी इर्शाद पाशा…
परभणी (प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कै. यशवंत पाध्ये पुरस्कार भुषण मोरे यांना त्यांनी मागील 24 वर्षांमध्ये त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रामधील आदर्श कार्याची नाममुद्रा निर्माण केल्याबद्दल व त्या माध्यमातून सामाजिक सेवा केल्याबद्दल दिनांक 6 जानेवारी दर्पण दिनी माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दर्पण दिन व मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व कैलासवासी यशवंत पाध्ये यांच्या प्रतिमा चे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल तथा केंद्रीय मंत्री राम नाईक…
परभणी(प्रतिनिधी) -परभणी ते गंगाखेड रोड येथिल रेंगे फायन्स ते ब्रम्हणगांव या रस्त्यावर दिनांक 29 डिसेंबर रोजी आपघाताची घटना घडली होती.त्या घटनेत मयत सुरजद गंगाधर जाधव यांचा 1 जानेवारी रोजी खाजगी रुग्णालयात मृत्यु झाला होता.परंतु हा आपघात नसुन घातपात आसल्याचा आरोप नातेईवाकांनी केला होता.या पार्श्वभुमिवर लालसेनाच्या वतीने आज बुधवार 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना संबंधी आरोपीना तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी लालसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळानी निवेदन देण्यात आले असुन या घटनेच्या निषेधार्था दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात येणार आसल्याची माहिती लालसेनाचे प्रमुख काॅ.गणपत भिसे…

