परभणी ( प्रतिनिधी) दुधगांव महसुल मंडळातील शेतकऱ्यांना भावांतर योजने अंतर्गत सोयाबीन व कापुस या पिकांस हेक्टरी 5000 अनुदान अद्याप पर्यंत प्राप्त झाले नाही अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे तसेच खरिप-2024 अग्रीम पिक विमा मिळणे व तसेच 2021 व 2023 खरिप व रब्बी चा पिक विमा मिळावा या व अन्य मागणीसाठी दुधगांव महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी आज दिनांक 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

लवकरात लवकर पिक विमा देव्याचे आदेशित करावे अन्यथा लोकशाही मार्गाने दि. 24/01/2025 पासून मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात दुधगांव महसुल मंडळातील शेतकरी इर्शाद पाशा चांद पाशा, बंडू, पारवे, शिवाजी पवार, गजानन, अजय पारवे, न्यानेश्र्वर राऊत, प्रभाकर राऊत, युवराज पारवे, कालिदास पारवे, गणेश, जीवन कुबे आदिंसमवेत असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


