Author: Lok Sanchar

परभणी( प्रतिनिधी) परभणी तील संविधान प्रतिकृती विटंबननेनंतर आंबेडकर चळवळीतील लोकनेते विजय वाकोडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना सामाजिक , मानसिक आणि आर्थिक पाठबळाची गरज होती. ही गरज ओळखून समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी या कुटुंबीयांना फार मोठा मानसिक आधार दिला सोबतच आर्थिक सहकार्याचे आव्हान केले आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. या आव्हानाला प्रतिसाद म्हणून संबोधी विद्यालय,परभणी च्या वतीने रु.27600 आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश दि.06 जानेवारी रोजी लोकनेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्याकडे संबोधी विद्यालयाचे स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष भगवान जगताप यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी रवि…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) परभणीत व्हाईस ऑफ मीडियाच्या सर्व शाखेच्या वतीने व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग जिल्हा कार्यालयात दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा  मार्गदर्शक सुरेश जंपनगिरे,मराठवाडा कार्यकारीणी सदस्य प्रविण चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित  झालेल्या कार्यक्रमात दर्पणकारांच्या कार्यास उजाळा देण्यात आला, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी प्रास्ताविकात संघटनेची ध्येयधोरणे, आगामी वाटचाल आणि परभणीत उभारण्यात येणाऱ्या पत्रकार गृहनिर्माण सोसायटी याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मदनबापू कोल्हे, दत्तात्रय कराळे, रामेश्वर बद्दर, रमेश नाटकर, दिलीप बोरुळ या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. विभागीय मार्गदर्शक सुरेश जंपनगिरे यांच्यासह जिल्हा कार्यकारणीतील शेख मुबारक,कैलास चव्हाण, बालासाहेब काळे,…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा तत्परतेने लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्रीमती बोर्डीकर यांनी आज विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगर पालिका आयुक्त धैर्यशील जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आदींसह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, महिला व बालकल्याण, महाऊर्जा, ग्रामीण पाणीपुरवठा व…

Read More

परभणी (प्रतिनिधी) प्रति वर्षी प्रमाणे कै. बकुळाबाई मुकुंदराव पेडगावकर यांच्या स्मरणार्थ कै. स्वा. सै. श्रीमती शांताबाई देशपांडे पेडगावकर यांच्यातर्फे देण्यात येणारा लोपामुद्रा पुरस्कार यावर्षी सोलापूर येथील समाजसेवक आतिश लक्ष्मण शिरसाट यांना प्रदान करण्यात आला. यावेळी लोपामुद्रा पुरस्कार प्राप्त झालेले अतिश सिरसाट सोलापूर येथे आपल्या संभव या संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्ण झालेल्या व्यक्तींवर उपचार करून पुनर्वसन करण्यासाठी मदत करतात. लोपामुद्रा पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानपत्र व पाच हजार रुपये रोख असे आहे. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे. यावेळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना सिरसाट यांनी थोडक्यात आपल्या कार्याची माहिती श्रोत्यांना दिली, सोलापूर परीसरातील व इतर ठिकाणची, कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशांतील बऱ्याच ठिकाणची जवळ जवळ…

Read More

पालम (प्रतिनिधी) पालम येथे भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करण्यात आली हि नोंदणी 15 दिवस चालनार आहे. दि. 5 जानेवारी रोजी 761 लोकांनी भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी झाल्याचे सागण्यात आले आहे. हि नोदणी 15 दिवस चालनार आसुन या 15 दिवसात सर्वात जास्तीत जास्त नोंदणी होणार असल्याचे सागण्यात आले आहे. या भाजपा सदस्य नोंदणी प्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव रोकडे,भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लिंबाजीराव टोले, तालुका अध्यक्ष रुपेश शिनगारे, सदस्य नोंदणी संयोजक हनुमान देशमुख, सहसंयोजक मधुकराव रोकडे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष रामजी गावंडे, निवृती रेडी,रामेशवर सुरनर,साहेबराव सुरनर, बालु बरडे, रोहीदास यबलवाड व इतर भाजपा कार्यकर्ते…

Read More

परभणी (प्रतिनिधी) सन 2025 चा मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिला जाणारा कै.यशवंत पाथ्ये स्मृती पुरस्कार भूषण मोरे यांना पत्रकारिता क्षेत्रात भरीव आदर्श कार्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या 24 व्या वर्धापनात दिनानिमित्त पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.भूषण मोरे हे मागील 24 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्य करत असून या माध्यमातून ते जनतेची सेवा करतात सध्या ते परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे समन्वयक आहेत.सदरची निवड झाल्याचे पत्र मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी पाठविले असून पुरस्कार वितरण हे दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दर्पण दिनी सायंकाळी 4 वा.…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जन्मभूमी आणि कर्मभूमी पुणे असणार्‍या ‘पुण्यातील परभणीकर क्लब’ने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या परभणी जिल्ह्यातील सात मान्यवरांना परभणी भूषण पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले. शनिवार 4 जानेवारी रोजी पुणे येथील करवे रस्त्यावरील नळस्टॉप जवळील क्रिस्पिंस होमच्या प्रांगणात सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सोनपेठचे डॉ. मोहन देशमुख, महारुद्र गिरी, प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल सुनील पोटेकर, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामकाजाबद्दल अशोक देशमाने, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल डॉ. सदानंद उंडेगावकर, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजू काजे, रोहित नागभिडे व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीमती स्वप्ना…

Read More

जेष्ठ पत्रकार हेमंत कौसडीकर, विजय जोशी, संतोष धारासुरकर, दिलीप माने, नितीन धूत, रमाकांत कुलकर्णी यांचा सत्कार परभणी(प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. यामुळेच देशभरात 6 जानेवारी हा दर्पण दिन साजरा केला जातो. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 6 जानेवारी रोजी कै. हेमराज जैन सभागृह, शारदा महाविद्यालयात 11.30 वाजता दर्पण दिन आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दर्पण दिन आणि ज्येष्ठ पत्रकार सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यीक डॉ. आसाराम लोमटे हे राहणार आहेत. तर…

Read More

परभणी (प्रतिनिधी)  स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवस, रात्र रुग्णसेवेत केवळ नौकरी म्हणुन नव्हे तर संकट काळात सामाजिक बांधिलकी म्हणून परिचारिका काम करत असतात हे कोरोना काळात अनुभवले आहे. आजही त्याच निष्ठेने त्यांचे कार्य सुरु आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागेश लखमावार यांनी केले. येथील धनेश्वरी मानव विकास मंडळ संचलित परभणी नर्सिंग कॉलेज बी.एसस्सी. नर्सिंग विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण समारंभ दि.२ जानेवारी रोजी परभणी मेडिकल कॉलेज येथे पार पडला. यावेळी डॉ. लखमावार बोलत होते.  यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, पेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणार्‍या सर्व आरोपींना तातडीने अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी (दि.4) परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय, सकल मराठा समाज व अन्य संघटना व प्रतिष्ठानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा मूक मोर्चा काढला. यात स्व. देशमुख यांच्या मातोश्री तसेच त्यांचे बंधू, बहिण, मुलगी व मुलगा सहभागी झाले होते. या मोर्चाचा समारोप सभेतून झाला. जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी रेलचेल सुरु झाली. विशेषतः सर्व तालुकास्थानांसह तालुक्यातून एका पाठोपाठ एक भरगच्च अशी वाहने मोठ्या संख्येने दाखल होत होती. चोहोबाजूंच्या वाहनांच्या या रांगांमुळे गंगाखेड, जिंतूर,…

Read More