जेष्ठ पत्रकार हेमंत कौसडीकर, विजय जोशी, संतोष धारासुरकर, दिलीप माने, नितीन धूत, रमाकांत कुलकर्णी यांचा सत्कार
परभणी(प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. यामुळेच देशभरात 6 जानेवारी हा दर्पण दिन साजरा केला जातो. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 6 जानेवारी रोजी कै. हेमराज जैन सभागृह, शारदा महाविद्यालयात 11.30 वाजता दर्पण दिन आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
दर्पण दिन आणि ज्येष्ठ पत्रकार सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यीक डॉ. आसाराम लोमटे हे राहणार आहेत. तर उदघाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. इंद्र मणि यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद घोंगडे, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉ. भारत नांदुरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमा पुजनानंतर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार तथा दै. समर्थ दिलासाचे संस्थापक विजय जोशी, दै. दिलासाचे संपादक संतोष धारासुरकर, दै. लोकप्रश्नचे संपादक दिलीप माने, दै. लोकसंचारचे संपादक हेमंत कौसडीकर, दै. मराठवाडा साथीचे आवृत्ती संपादक नितीन धुत, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, मार्गदर्शक प्रविण देशपांडे, माजी अध्यक्ष राजकुमार हट्टेकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, महानगरअध्यक्ष शिवशंकर सोनुने, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष शेख इफ्तेखार, डिजीटल मिडीयाचे महानगराध्यक्ष राहूल वाहिवाळ यांच्यासह प्रदेश प्रतिनिधी धाराजी भुसारे, विठ्ठल वडकुते, मोईन खान, सुधाकर श्रीखंडे, सुरेंद्र पाथरीकर, रामचंद्र कोठेकर, अनिल दाभाडकर, प्रकाश साळवे, लक्ष्मीकांत बनसोडे, उत्तम बोरसुरीकर, फहीम काजी, जकीयोद्दीन खतीब, भूषण मोरे, मंचक खंदारे, माणिक शिंदे, प्रशांत खंदारे, महेमुद खान आदींनी केले आहे.


