परभणी( प्रतिनिधी) परभणी तील संविधान प्रतिकृती विटंबननेनंतर आंबेडकर चळवळीतील लोकनेते विजय वाकोडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना सामाजिक , मानसिक आणि आर्थिक पाठबळाची गरज होती. ही गरज ओळखून समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी या कुटुंबीयांना फार मोठा मानसिक आधार दिला सोबतच आर्थिक सहकार्याचे आव्हान केले आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. या आव्हानाला प्रतिसाद म्हणून संबोधी विद्यालय,परभणी च्या वतीने रु.27600 आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश दि.06 जानेवारी रोजी लोकनेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्याकडे संबोधी विद्यालयाचे स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष भगवान जगताप यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी रवि सोनकांबळे , शेषराव जल्हारे,सिद्धार्थ भराडे राहूल घनसावंत सुधिर साळवे मुख्याध्यापक अविनाश मालसमिंदर आदि उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


