Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : जय बजरंगी हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नववर्षानिमित्त महेश मंदिरात रविवारी (दि.5) संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार करण्यात येणार आहे. अकराशेहुन अधिक दिवे प्रज्वलित करून सर्वत्र शांतता राहावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा तसेच 2025 हे वर्ष सुख, समाधान आणि शांतीचे तसेच भरभराटीचे जावो यासाठी दरवर्षी जय बजरंगी हनुमान चालीसा मंडळ सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करते. यावर्षीचे हे पाचवे वर्ष आहे. विष्णू नगरातील महेश मंदिरात सकाळी 8.00 वाजता श्री राम, लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमा पूजनाने या संगीतमय हनुमान चालीसा पठणाला प्रारंभ होणार आहे. दिवसभर शेकडो हनुमान भक्त भाविक सह…

Read More

पालम (प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीम रक्कम, अतिवृष्टी अनुदान मिळणेसाठी व बोगस पिक विमा भरून विमा घोटाळा करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पालम तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव ऍड.राहुल हत्तीअंबीरे काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले, काँग्रेस नेते अकबर खान पठाण, रिपाई जिल्हाध्यक्ष निवृत्ती हत्तीआंबीरे, तालुका उपाध्यक्ष माधव फाजगे,हबीब चाऊस,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष साबिर भाई कुरेशी, शेतकरी मित्र आबरार भाई काझी, वामन शेंगुले, शेख आबेद,उन्मेष साळवे आदी उपस्थित होते

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर नियतव्ययानुसार विविध विकास कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कालावधी कमी असल्यामुळे ज्या विभागांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही अद्याप झालेली नाही, त्यांनी तात्काळ कार्यवाही पूर्ण करुन विकास कामे सुरु करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा वार्षिक योजनेबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे आदींसह विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, चालू वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा विकास कामांवर खर्च करण्यासाठी कमी कालावधी…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्षपूर्ती निमित्त लीड बँकेच्यावतीने स्नेह वृद्धाश्रमात गुरुवारी (दि. 2) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते वृध्दाश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय व्यवस्थापक सम्राट पुरकायस्थ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रमुख जिल्हा अधिकारी राजेंद्र कनिशेट्टी, लीड बँक ऑफ इंडिया जिल्हयाचे मुख्य व्यवस्थापक उदय एस. कुलकर्णी, वृद्धाश्रमाच्या प्रभारी श्रीमती सुनीता अहिरे, आरसेटीचे संचालक जितेंदर सिंग कुशवाह आदी उपस्थित होते. आयोजकांच्यावतीने वृद्धाश्रमातील महिलांना दुपारचे भोजन देण्यात आले. कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल श्रीमती अहिरे यांनी आभार मानले. *-*-*-*-*

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जन्मभूमी आणि कर्मभूमी पुणे असणार्‍या ‘पुण्यातील परभणीकर क्लब’ने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या परभणी जिल्ह्यातील सात मान्यवरांना परभणी भूषण पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सोनपेठचे डॉ. मोहन देशमुख, महारुद्र गिरी, प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल सुनील पोटेकर, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामकाजाबद्दल अशोक देशमाने, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल डॉ. सदानंद उंडेगावकर, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजू काजे, रोहित नागभिडे व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीमती स्वप्ना रत्नाळीकर कुर्डूकर यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून अमेरिकेतील इलास महाराष्ट्र मित्र मंडळाच्या अध्यक्षा शामली बीडकर, फोटोग्रामी आणि व्हिडीओग्राफी क्षेत्रातील रश्मी देशमुख व फुड इंडस्ट्रीमध्ये सुमेधा धोंड जळगावकर…

Read More

परभणी (प्रतिनिधी) परभणी-हिंगोली या दोन जिल्हयातील भाविकांसाठी परभणी येथे दोन दिवसीय तब्लीगी इज्तेमाचे आयोजन दि.1 व 2 जानेवारी रोजी करण्यात आले होते. कुराण व प्रेषित मोहम्मद पैंगबर यांनी दिलेल्या शिकवणीसह संदेशाचे प्रत्येक मुस्लिम बांधवाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरण केले पाहिजे, एकमेकांविषयीची प्रेम, व सलोख्याचे नाते ठेवत एकदुसºयाला सहकार्य केले पाहीजे .सदरील इज्तेमामध्ये तब्लीगी जमातचे अध्यक्ष मौलाना सय्यद महेमुद अली यांनी रात्री 8.50 सामूहिक दुवा(प्रार्थना) केल्यानंतर इज्तेमाचा समारोप झाला. परभणी आणि हिंगोली या जिल्हयातील नागरिकांसाठी सुमारे ८० एकरवर इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी फजरच्या नमाज नंतर इज्तेमाला सुरुवात झाली. विशेषत: विविध मौलवींनी विविध विषयात मोलाचे मार्गदर्शन केले. दूसºया सत्रात जोहरच्या…

Read More

परभणी (प्रतिनिधी) सावित्रीआई फुले यांच्या जयंतीदिनी साऊ-फातेमा-जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत शुक्रवार ३ जानेवारी रोजी महात्मा फुले यांच्या पुतुळ्याजवळ सावता परिषद परभणी च्या वतीने मोफत साविधान मूल्यांकन पुस्तिकेचे वाटप करण्यात आली. सावित्रीआई फुले यांची 194 वी जयंती अतिशय हार्शउल्लासात सावता परिषदेच्या वतीने साजरी करण्यात आली . या मधे सावित्रीआई फुले , फातेमा शेख व जिजामाता या मतांची एकत्रित जयंती निमित्त साविधान मूल्यांकन पुस्तिका वाटपाचा स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला . विशेष म्हणजे या तिन्ही मातेंचा जन्म दिवस एकाच महिन्यात येतो हा योगायोग किती महान आहे या मुळे असे उपक्रम सावता परिषद प्रत्येक वर्षी राबवणार असल्याचे कृष्णा कटारे यांनी बोलताना सांगितले . या…

Read More

परभणी ( प्रतिनिधी) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्या तीन जणांना पोलिसांना पकडण्यात अपयश आला आहे. मागील अनेक दिवसांपासून हे आरोपी फरार आहेत. परंतु पोलीस प्रशासन त्यांना अद्यापही अटक करू शकले नाही। याच्या विरोधामध्ये रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी परभणी येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन कडक शासन करावं, अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा रयत क्रांती संघटना चक्काजाम आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या निवेदनावर स्वाक्षऱ्या पिंटू भाऊ गडदे. शेख मुनीर शेख बाबन. सुभाष गायकवाड. शेख मोईदीन…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफिसर प्रॉव्हिडंट फंड या पदासाठी जुलै 2024 आणि नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये परभणी येथील माजी खासदार स्व. शेषरावजी देशमुख यांचे नातू आणि स्व. संजयराव देशमुख यांचे चिरंजीव हरीश संजयराव देशमुख यांची निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड झाल्याबाबतची यादी आज गुरुवार 02 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून हरीश संजयराव देशमुख यांची ऑल इंडिया रँक 87 वी आहे. हरीशच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेसह स्व. सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते स्व. विजय वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणात आपण संसदेत आवाज उठवून त्या दोघांच्या कुटूंबियांसह आंबेडकरी चळवळीस न्याय मिळवून देवू, असा विश्‍वास भिम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिला. खासदार आझाद यांनी गुरुवारी सकाळी परभणीत दाखल झाल्या पाठोपाठ स्व. सूर्यवंशी व स्व. वाकोडे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले. त्या पाठोपाठ जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर आंबेडकरी चळवळीच्या वतीने सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास भेट दिली. त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परभणीतील घटना दुर्देवी आहे, या घटनेबाबत आपण तात्काळ माहिती…

Read More