परभणी (प्रतिनिधी) सावित्रीआई फुले यांच्या जयंतीदिनी साऊ-फातेमा-जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत शुक्रवार ३ जानेवारी रोजी महात्मा फुले यांच्या पुतुळ्याजवळ सावता परिषद परभणी च्या वतीने मोफत साविधान मूल्यांकन पुस्तिकेचे वाटप करण्यात आली.
सावित्रीआई फुले यांची 194 वी जयंती अतिशय हार्शउल्लासात सावता परिषदेच्या वतीने साजरी करण्यात आली . या मधे सावित्रीआई फुले , फातेमा शेख व जिजामाता या मतांची एकत्रित जयंती निमित्त साविधान मूल्यांकन पुस्तिका वाटपाचा स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला . विशेष म्हणजे या तिन्ही मातेंचा जन्म दिवस एकाच महिन्यात येतो हा योगायोग किती महान आहे या मुळे असे उपक्रम सावता परिषद प्रत्येक वर्षी राबवणार असल्याचे कृष्णा कटारे यांनी बोलताना सांगितले .
या वेळी सावता परिषदेचे कृष्णा कटारे , साहेबराव जाधव , धोंडीराम सातवने , श्याम रासवे , प्रसाद गोरे , अनिल गोरे , रोहित राऊत ,सुमित जाधव , मुंजाभाऊ हरकाळ , सावता रासवे ,कुणाल गायकवाड , एड श्रीहरी भुजबळ यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्तीत होते ( छाया संजय घनसावंत)


