परभणी ( प्रतिनिधी) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्या तीन जणांना पोलिसांना पकडण्यात अपयश आला आहे. मागील अनेक दिवसांपासून हे आरोपी फरार आहेत. परंतु पोलीस प्रशासन त्यांना अद्यापही अटक करू शकले नाही। याच्या विरोधामध्ये रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी परभणी येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन कडक शासन करावं, अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा रयत क्रांती संघटना चक्काजाम आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या निवेदनावर स्वाक्षऱ्या पिंटू भाऊ गडदे. शेख मुनीर शेख बाबन. सुभाष गायकवाड. शेख मोईदीन शेख अहमद. देविदास काळे परविन काळे अनिल जाधव सचिन काळे इत्यादीच्या स्वाक्षरी आहेत. (छाया संजय घनसावंत)


