परभणी ( प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये परिपत्रक असतानाही अद्यापही परभणी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेचे आयोजनाबाबत परिपत्रक न काढल्यामुळे मा.रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. परभणी जिल्हा शालेय विनाअनुदानित खेळाच्या स्पर्धा अद्याप पर्यंत सुरु झाल्यानाहीत त्यास्पर्धा सुरु करुन खेळाडुंचे नुकसान टाळावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांना देवुन विविध समस्या बाबत चर्चा करताना परभणी जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रणजीत काकडे , महानगर सचिव पी. आर. जाधव, टेनिव्हाँलीबाँल महाराष्ट्र संघटनेचे राज्य सचिव गणेश माळवे, जिल्हा सचिव प्रशांत नाईक, मुझिकल चेअर संघटनेचे राज्य सचिव टि.के. ठोंबरे ,…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) परभणी-तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या लोहगाव (ठाकूरबुवा) येथील भगवान बाबासाहेब गरुड महाराज लिखित संकलन-संपादन नित्यसेवा-लोहगांव ठाकूरबुवा मंदिर, लोहगांव, ता. जि. परभणी, (महाराष्ट्र) असलेल्या कथा ठाकूरबुवा घराण्याची (कथा विठ्ठल भक्तीची) अर्थात “आली पंढरी ठाकूरबुवा नगरी” या पुस्तकाचे विमोचन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभ हस्ते ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे येथे एका कार्यक्रमात नुकतेच करण्यात आले आहे. याप्रसंगी श्रीमती मंजरीताई ताम्हणकर, श्री संजय पेटकर, श्री प्रकाश कडू , नंदकिशोर जोशी व समस्त कार्यकारी मंडळ माऊली सेवा संघ, पुणे उपस्थित होते.दरम्यान,परभणी तालुक्यातील लोहगाव (ठाकूरबुवा) येथे महापूजा अभिषेक व प्रसाद या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते अशी माहिती ठाकूर बुवांचे…
परभणी, (प्रतिनिधी) नगर विकास विभाग यांच्यावतीने आयोजित जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२५ चे आज दि. 2 जानेवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे उद्घाटन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी, उद्घाटक म्हणून धैर्यशील जाधव, आयुक्त परभणी मनपा,आयोजक प्रदीप जगताप, जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय हे उपस्थित होते. कार्यक्रमास जयवंत सोनावणे मुख्याधिकारी, नगर परिषद गंगाखेड, डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णा, बबन तडवी, उपआयुक्त मनपा परभणी,तुकाराम कदम मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी,आशुतोष चिंचाळकर मुख्याधिकारी नगर पंचायत पालम,कोमल सावरे मुख्याधिकारी नगर परिषद मानवत, युवराज पौळ मुख्याधिकारी नगर परिषद सेलू, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, मनपा क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव…
परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग व जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव विभागातर्फे दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळीअध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे(भाप्रसे), तर उद्घाटक म्हणून धैर्यशील जाधव आयुक्त परभणी मनपा उपास्थित होते. तसेच आयोजक प्रदीप जगताप जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी याच्या सह या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती जयवंत सोनावणे मुख्याधिकारी नगर परिषद गंगाखेड,डॉ. उत्कर्ष गुट्टे मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णा,बबन तडवी उपआयुक्त मनपा परभणी,तुकाराम कदम मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी,आशुतोष चिंचाळकर मुख्याधिकारी नगर पंचायत पालम,श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी नगर परिषद मानवत, युवराज पौळ मुख्याधिकारी नगर परिषद सेलू, जिल्हा क्रीडा अधिकारी…
परभणी,(प्रतिनिधी) : मस्सजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणार्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवारी (दि.4) परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालया पासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक -शनी मंदिर – नानल पेठ कॉर्नर- छत्रपती शिवाजी चौक- गांधी पार्क- नारायण चाळमार्गे महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात स्व.संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप…
पूर्णा (प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान ‘ रौप्य महोत्सव ‘ निमित्ताने आयोजित ऋग्वेदांचे दशग्रंथ षडंगसहित संहिता पदक्रम पारायणास आज (बुधवार, ता.2 जानेवारी २०२५) देशातील नामांकित घनपाठी वैदिकांच्या उपस्थितीत विधिवत सुरुवात झाली. श्रीदाजीमहाराज संस्थान,श्रीगंगाजीबापू गो सेवा प्रकल्प, सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान व श्रीदाजीमहाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन केले आहे.त्या निमित्ताने दि.2 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत धार्मिक,अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, विविध स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत. भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची भागवत कथा,प्रसिद्ध कीर्तनकारांचा नाम संकीर्तन सप्ताह, विविध क्षेत्रीय कर्तृत्ववानांचा कार्य गौरव इत्यादीचा समावेश आहे.…
परभणी (प्रतिनिधी) भीमा कोरेगाव शौर्य विजय दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने दिला जाणारा नामांतर योद्धा पुरस्कार दलीत पँथर चे सक्रिय नेते पूर्णा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाशदादा कांबळे यांना नामांतर लढ्यातील योगदाना बद्द्ल जाहीर करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे म्हणून सतरा वर्षे चाललेल्या नमांतर लढ्यात योगदान देणाऱ्या एका आंदोलकाचा दरवर्षी सन्मान केला जातो. मुंबई येथील ५ सप्टेंबर १९८३ च्या जेलभरो आंदोलनात सहकाऱ्यांसह प्रकाशदादा कांबळे हे सहभागी झाले होते. नाशिकच्या कारागृहात २१ दिवस त्यांना कारावास भोगावा लागला. धम्म मैत्री संवाद अभियान आयोजित १९ जनेवारी रोजी रविवारी…
परभणी, (प्रतिनिधी) येथील जिंतूर रोड बायपासजवळ वार्षिकी तबलिगी इज्तेमाचे 1 आणि 2 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिंतूरकडून जिंतूर रोडने परभणी शहराकडे येणारी अवजड वाहतूक तसेच पाथरी रोडने परभणी शहराकडे येणारी अवजड वाहने व सिंगणापूर फाटा येथून परभणी शहरातून पाथरी – जिंतूरकडे जाणारी अवजड वाहनांचे वाहतुकीस गुरुवार (दि.02) चे सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यतच्या कालावधीसाठी अवजड वाहनांच्या रहदारीसाठी वाहतूक मार्ग बंद करण्यात येत आहे. *या मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी* जिंतूर…
सेलू(प्रतिनिधी) येथील नूतन महाविद्यालयात बुधवार ( दि. ०१ ) रोजी ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमा अंतर्गत वाचन कौशल्य तथा पुस्तक कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.०१ ते १५ जानेवारी दरम्यान हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत नंदिनी शिंदे ( पसायधन), द्रोपदी सिताफळे ( मन मे है विश्वास ) , अनिकेत जगदाळे ( माणसे जोडावी कशी ? ), संजीवनी काकडे, कृष्णा कारके ( अग्निपंख ), दिपाली सीताफळे ( श्यामची आई ), रत्नमाला तिडके ( मृत्युंजय ), गीता डुकरे ( गरुड झेप ) रोहिणी वंजे ( असे घडवा तुमचे भविष्य ) ,…
परभणी( प्रतिनिधी ) येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा म्हणून 200 गरीब व गरजू महिला व पुरुषांना गरम ब्लॅंकेटचे वाटप जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व आ.डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतिदुत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड. अशोक सोनी, प्राचार्य बाळासाहेब जाधव, डॉ. दिनेश भुतडा, प्रा. सुरेश नाईकवाडे, डॉ. रितेश अग्रवाल, डॉ.अब्दुल सलिम, डॉ.सालेहा कौसर, सौ . वर्षा सारडा हे उपस्थित होते.शांतिदुत सेवाभावी संस्था मागील 21 वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्यात गरजू व गरिबांना गरम ब्लँकेटचे वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहे. यावेळी बोलताना रवींद्रसिंह परदेशी…

