सेलू(प्रतिनिधी) येथील नूतन महाविद्यालयात बुधवार ( दि. ०१ ) रोजी ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमा अंतर्गत वाचन कौशल्य तथा पुस्तक कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.०१ ते १५ जानेवारी दरम्यान हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत नंदिनी शिंदे ( पसायधन), द्रोपदी सिताफळे ( मन मे है विश्वास ) , अनिकेत जगदाळे ( माणसे जोडावी कशी ? ), संजीवनी काकडे, कृष्णा कारके ( अग्निपंख ), दिपाली सीताफळे ( श्यामची आई ), रत्नमाला तिडके ( मृत्युंजय ), गीता डुकरे ( गरुड झेप ) रोहिणी वंजे ( असे घडवा तुमचे भविष्य ) , चंचल ढोणे ( अहिल्याबाई होळकर ), ज्योती शेजुळ ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर परीक्षण कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. उत्तम राठोड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॅा. मोहन काटकर यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॅा महेंद्र शिंदे, डॅा राजराम झोडगे, प्रा. अनंत मोगल, प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी मुलांना वाचनकौशल्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रद्धा गिराम यांनी केले. तर आभार अभिजीत खरात यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


