परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग व जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव विभागातर्फे दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळीअध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे(भाप्रसे), तर उद्घाटक म्हणून धैर्यशील जाधव आयुक्त परभणी मनपा उपास्थित होते. तसेच आयोजक प्रदीप जगताप जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी याच्या सह या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती जयवंत सोनावणे मुख्याधिकारी नगर परिषद गंगाखेड,डॉ. उत्कर्ष गुट्टे मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णा,बबन तडवी उपआयुक्त मनपा परभणी,तुकाराम कदम मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी,आशुतोष चिंचाळकर मुख्याधिकारी नगर पंचायत पालम,श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी नगर परिषद मानवत, युवराज पौळ मुख्याधिकारी नगर परिषद सेलू, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, मनपा क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव ,चंद्रकांत पवार, उमेश आर्दड यांच्यासह परभणी शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायत विभागाचे कर्मचारी अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती ( छाया उत्तम बोरसुरीकर)


