परभणी ( प्रतिनिधी) परभणी-तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या लोहगाव (ठाकूरबुवा) येथील भगवान बाबासाहेब गरुड महाराज लिखित संकलन-संपादन नित्यसेवा-लोहगांव ठाकूरबुवा मंदिर, लोहगांव, ता. जि. परभणी, (महाराष्ट्र) असलेल्या कथा ठाकूरबुवा घराण्याची (कथा विठ्ठल भक्तीची) अर्थात “आली पंढरी ठाकूरबुवा नगरी” या पुस्तकाचे विमोचन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभ हस्ते ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे येथे एका कार्यक्रमात नुकतेच करण्यात आले आहे.
याप्रसंगी श्रीमती मंजरीताई ताम्हणकर, श्री संजय पेटकर, श्री प्रकाश कडू , नंदकिशोर जोशी व समस्त कार्यकारी मंडळ माऊली सेवा संघ, पुणे उपस्थित होते.दरम्यान,परभणी तालुक्यातील लोहगाव (ठाकूरबुवा) येथे महापूजा अभिषेक व प्रसाद या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते अशी माहिती ठाकूर बुवांचे भक्त भगवानराव गरूड यांनी दिली.परभणी शहरापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोहगाव (ठा.) येथे श्री संत हरिबाबा महाराज यांची समाधी आहे. या ठिकाणी सभामंडप असून लाकडी बांधकाम करण्यात आले आहे. श्री संत हरिबाबा महाराज यांचे लोहगाव (ठा.) हे एक जागृत स्थान आहे. आजही दर एकादशीला वारकरी संप्रदायी येथे दर्शनासाठी येत असतात. भजन, पूजन, किर्तन कार्यक्रम आयोजन करण्यात येते. कै. बाबासाहेब एकनाथबुवा यांचे श्री भगवान गरूड हे चिरंजीव असून ह.भ.प. नारायण महाराज यांचे पुतणे आहेत. गेली चाळीस वर्षे श्रावण महिन्यात हरि विजय, रामायण, महाभारत, भागवत शिव -लीलामृत या ग्रंथाचे गावकरी व भक्त मंडळीसमोर दर एकादशीला व ‘गुरुवारी वाचन करुन ज्ञानार्जनाचे कार्य करत असतात. ठाकूर बुवांचे वंशज भगवानराव गरूड व त्याच्या सुविद्य पत्नी सौ. शकुंतला गरूड हे ठाकूर बुवांची मनोभावे सेवा करत आहेत.पुणे येथे एका कार्यक्रमात “आली पंढरी ठाकूरबुवा नगरी” या पुस्तकाचे विमोचन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


