Author: Lok Sanchar

सेलूत माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात सेलू (प्रतिनिधी)अभ्यासक्रम पूरक उपक्रमातून विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास करतानांच आमच्यावरती माणूस घडविण्याची जीवनमूल्ये रूजवली. तसेच चारित्र्य, त्याग नम्रता या संस्कारातून आम्ही घडत गेलो म्हणूनच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्वाभिमानाने उभे आहोत, असे प्रतिपादन पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी प्रा.डॉ.इच्छा शिंदे यांनी रविवारी, २९ डिसेंबर रोजी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त २८, २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थिनी मेळाव्यात विविध कार्यक्रम झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर,…

Read More

सेलू, (प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूल, सेलू येथे ‘फेस्टिवल ऑफ इंडिया’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांची अभिव्यक्ती आणि भारतीय सण-उत्सवांची पारंपरिक झलक यांची संगम पाहायला मिळाल्याने कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व नटराज मूर्ती पूजनाने करण्यात आली. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला आणि प्राचार्य प्रगती क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून कैलास काळे, बाबासाहेब भाबट, संतोष भरदम, सुशील नाईकवाडे, शेख मुस्ताक शेख बशीर आणि कांता वानखेडे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी भारतीय…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथून दु. १.०० वा. राहूलनगर, परभणी येथे आगमन व दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट. दु. १.४५ वा. पार्वतीनगर, परभणी येथे दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट. दु. २.३० वा. शासकीय विश्रामगृह, परभणी येथे समाजकल्याण अधिकाऱ्यांसमवेत बैठक. दु. ४.०० वा. शासकीय विश्रामगृह, परभणी येथे पत्रकार परिषद. दु. ४.३० वा. छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.

Read More

गंगाखेड (प्रतिनिधी) शहरातील मागील 40 वर्षापासून घरगुती मेस चालवणाऱ्या व प्रत्येकाच्या तोंडी ताई, मावशी, आत्या असलेल्या राधाबाई हनुमानदास भंडारी ज्या गंगाखेड शहर व परिसरात साक्षात अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जात त्यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दिनांक 28 डिसेंबर रोजी निधन झाले. शहरांमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने येणारे विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने येणारे कर्मचारी, बँकेतील कर्मचारी या एक ना अशा कितीतरी जणांना आपल्या हातचे चविष्ट, रुचकर जेवण आत्मीयतेने जेवु घालणाऱ्या राधा मावशी यांच्या जाण्याने शहर व परिसरात शोककळा पसरली. दर एकादशीला फळा येथील संत मोतीराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणे व प्रत्येक दिवाळीमध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या शेगाव या ठिकाणी त्या जात असत .अत्यंत शांत, संयमी,…

Read More

परभणी (प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी व बाल कल्याण समिती, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विद्यामंदिर वैभव नगर, परभणी येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश उज्वला एम. नंदेश्वर आणि सचिव अर्चना एम. तामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समिती परभणी चे अध्यक्ष ॲड. रवींद्र कातनेश्वरकर समितीच्या सदस्या ॲड. वनिता काळवीट सेलूकर, श्रीमती अर्चना मेश्राम तर पोलीस विभागातील भरोसा सेल च्या उपनिरीक्षक स्वाती कवाळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी साक्षरता मंडळ क्रमांक एक…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : सदस्य नोंदणी अभियानातून या जिल्ह्यात नवीन दोन लाख सदस्य नोंदणीचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांनी निरीक्षकांसह संघटनमंत्र्यांसमोर सोडला. सदस्य नोंदणीच्या पार्श्‍वभूमीवर येथील आयएमएच्या सभागृहात शनिवार 28 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, तसेच प्रदेश सचिव राहुल लोणीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख, जिल्हा महामंत्री सुभाष आंबट, डॉ. केदार खटींग, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विलास बाबर, शिवाजीराव मव्हाळे, शशिकांत देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक पदाधिकार्‍याने या जिल्ह्यात सदस्य नोंदणीचे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याचा संकल्प सोडला. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित मॅथ क्विझ स्पर्धेमध्ये नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ते पुढील विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले. या स्पर्धेत कु.मोक्षदा लक्ष्मीकांत गरुड, कु.अदिती दयानंद जाधव, चि.सर्वेश संतोष पेडगावकर, चि. सोहम सुनील बल्लाळ हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. आता ते विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरले आहेत. संघातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक सुनील रामपूरकर, गणेश सूर्यवंशी, सुधाकर रेडगे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर, दिलीपराव कुलकर्णी, सचिव संतोष धारासुरकर,…

Read More

मुंबई:- आज दिनांक २८ डिसेंबर २०२४रोजी सह्याद्रि अतिथीगृहात एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या पार पडलेल्या बैठकित मा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ह्यानी मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फड़नवीस ह्यांच्या प्रमुख उपस्थितित होल्डिंग कंपनिच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला! उपाध्यक्ष तथा ऊर्जा राज्यमंत्री ह्या नात्याने मा मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस ह्यांच्या मार्गदर्शनखाली ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करने ,हरित ऊर्जेचा अधिक वापरावर भर देने, मराठवाड़्यासह राज्यातील वीज समस्यंचे निराकरण करने बाबत माझी आग्रही भूमिका राहिल आसा विश्वास मा. ना. मेघना बोर्डीकर ह्यानी या प्रसंगी व्यक्त केला. बैठकीकरिता प्रधान सचिव (ऊर्जा),महावितरण, महापारेषण, महानिर्मिति कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

Read More

सेलू:(प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सुरभी महोत्सव 2024 अंतर्गत प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचा ‘व्हायब्रंट इंडिया’ सांस्कृतिक कार्यक्रम दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सॅनरो नॉलेज सिटी येथे थाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे, डॉ. गणेश पारवे, डॉ. अपूर्वा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेंद्र शिंदे (उपप्राचार्य, नूतन महाविद्यालय, सेलू), एडवोकेट दत्तराव कदम, अजय डासाळकर, अनिल पवार, केशव सोळंके, डॉ. ऋतुराज साडेगावकर, आकाश टाक, डॉ. दत्तात्रय काकडे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला प्रगती क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.…

Read More

सेलू (प्रतिनिधी)  येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थीनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पहिल्या दिवशी शनिवारी ( दि. २८ ) माजी विद्यार्थीनी शाळेत दाखल झाल्या. शालेय परिसर, आपल्याला शिकवत असलेले शिक्षक, वर्ग मैत्रिणींना पाहून एकाच वेळी माजी विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर, डोळ्यात नकळत पाणीही तराळले. शाळेच्या प्रवेशद्वारावर आजी विद्यार्थीनींनी माजी विद्यार्थीनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. नूतन कन्या प्रशालेच्या १९७४ ते २०१५ या वर्षातील दहावीच्या बॅचच्या हैदराबाद, करिमनगर, मेहकर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, परतूर, नाशिक, वाशिम, नांदेड, बार्शीसह राज्यभरातून आलेल्या जवळपास ७६२ माजी विद्यार्थीनींची नोंदणी पहिल्या दिवशी झाली. माजी विद्यार्थीनींनी उत्साहात…

Read More