परभणी (प्रतिनिधी) परभणी -हिंगोली या दोन जिल्हयासाठी तब्लिगी जिल्हास्तरावर इज्तेमा दिनांक 1, 2 जानेवारी 2025पासून सुरु होणार आहे. या तब्लिगी इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या धार्मिक इज्तेमासाठी लाखोंच्या संख्येत भाविकांची उपस्थिती राहणार आहे . इज्तेमासाठी येणाºया भाविकांना सुविधा मिळावी म्हणून जिल्ह्यातील विविध भागातून हजारो युवक या ठिकाणी दिवसरात्र यासाठी परिश्रम घेत आहे. या इज्तेमाची वैशीष्टे म्हणजे या ठिकाणी केवळ आणि केवळ इस्लाम धर्म व त्याची शिकवण, अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पैगंबर यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. नियोजनबद्ध बसण्यासाठी सभामंडप उभारण्यात आला आहे मुख्य सभामंडपात एकाच वेळी लाखांपेक्षा अधिक नागरीक बसू…
Author: Lok Sanchar
परभणी,(प्रतिनिधी) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी महोत्सवा निमित्ताने गुरुवार 26 डिसेंबर रोजी येथील कार्यालयावर कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. दि. 26 डिसेंबर 1926 रोजी कानपूर उत्तर प्रदेश येथे स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 99 वर्षे पूर्ण होवून 100 वर्षात पदार्पण करत आहे. शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्ष सभासद व त्यांचे कुटुंबीय तसेच समाजवादी, अंबेडकरवादी, कामगार – कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी – युवक, साहित्यीक – सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, सहानुभूती दार, धर्म निरपेक्ष पक्ष तथा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ…
परभणी,(प्रतिनिधी): माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातही या दुखवट्यात कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी दिले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवार (दि.26) रोजी रात्री निधन झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असल्यामुळे 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 पर्यंत शासकीय कार्यालय व ज्या ठिकाणी नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्याठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावण्यात यावा. गुरुवार दि. 2 जानेवारी 2025 पासून राष्ट्रध्वज पूर्ण फडकविण्यात यावा, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.
परभणी, (प्रतिनिधी) ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमानिमित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालयात दि. 30 व 31 डिसेंबर, 2024 रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 375 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दि. 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत राबविला जाणार आहे. यामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कल्याण नगर, परभणी अंतर्गत आकाशकन्या प्रशाला परभणीच्या विद्यार्थ्यांची परभणी येथील गणेश वाचनालयास भेट व विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तसेच पुर्णा येथील स्वा. सै. सुर्यभानजी पवार महाविद्यालय व स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दि. 1 ते 15 जानेवारी…
परभणी (प्रतिनिधी) सोयाबीन विकुन महिना उलटला तरी आमचे पैसे आणखीन मिळाले नाही. तेव्हा स्वाभिमानीचे कार्यकर्ते गेले तेव्हा जिल्हा पणन अधिकारीतिथे उपस्थित नव्हते. आणि जे कर्मचारी उपस्थित होते ते उडवा उडवी चे उत्तर देत होते म्हणून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पणन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करत ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात आणुन ठेवली. सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने राज्य सरकारने पणन च्या मार्फत खरेदी सुरू केली. शेतकरी सोयाबीन घेऊन सरकारी काट्यावर गेल्यास कर्मचारी कपाळावर आठ्या घड्या पाडत मालाला नाव ठेवत कटी कपात करत शेतकऱ्याचा माल कसाबसा खरेदी करत आहेत. त्यात माल देऊनही एक महिना झाला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत. एकी कडे…
परभणी (प्रतिनिधी)गंगाखेड नाका उड्डाणपूल परिसरातील दोन दुकानांना भयंकर आग लागली . सायंकाळी साडेआठच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री साडेआठच्या सुमारास ही आग लागली यात चाऊस इलेक्ट्रिशियन आणि रॉयल मोटर्स या दुकानांचा या आगीत बरेचसे सामान जळाले आहे. सुरुवातीला त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झोपडीला आग लागली त्यानंतर या दोन्ही दुकानांना ही आग लागली. काही वेळातच अग्निशामन दलाच्या गाडी दाखल झाल्यानंतर बऱ्याचशा प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे गंगाखेड नाका अतिशय रहदारीचा रस्ता…
पालम (प्रतिनिधी ) तालुक्यातील मौजे पेठशिवणी शिवारातील गट क्रमांक 40/12 शेतामध्ये 40 ते 50 गांजाची झाडे आसल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांना मिळताच त्यांनी वरीष्ठाची परवानगी घेऊन पेठशिवणी शिवारातील आपला ताफा घेऊन गांजाची झाडे जप्त केली. यावेळी शेत मालक माधव हागरगे यांनी पोलीस आल्याचे पाहुण पळ काडला मात्र पोलीसानी पाटलाग करून त्यास पकडून ताब्यात घेतले. या शिवारात अंदाजे 12 किलो गांजा मिळाला असून यांची किंमत अंदाजे दोन लाख सहाशे पधरा रूपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरु होती. या वेळी पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,उपनि के.एस. देवघरे, पो.उप.नि. प्रकाश लोखडे, पो.ह. कल्यान साठे, जमादार बळवते, बालाजी…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल, परभणी या शाळेत 26डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण बोराडे,तर प्रमुख पाहुणे म्हणून वीर बालकांच्या वेशभूषेतील जोरावर सिंग यांच्या वेशातील कु.सिद्धी धानोरकर आणि फतेह सिंगांच्या वेशातील कु.साधना बाभुळगावकर ह्या विद्यार्थिनी होत्या. या प्रसंगी सुमेधा साबळे, अनुप देशमुख,अविष्कार गोरे,शौर्य कदम,शिवराज कदम,अथर्व रेंगे,शिवम काटकर,स्वराज जाधव आणि प्रतीक गुंगे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्ती पत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सुमेधा साबळे हिने आपले मनोगत व्यक्त केले.वीर बाल दिवसाचे औचित्य साधुन जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या बलिदानाची शौर्य गाथा सुंदर नाटिकेतून सादर करण्यात आली. या नाटिकेमध्ये- श्रद्धा पुरी, गार्गी कुलकर्णी,ईश्वरी…
परभणी,(प्रतिनिधी) केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्थांच्या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर व्हि.सी.द्वारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकतेच आयोजन करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव व पदाधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कुरुंदकर, नाबार्ड जिल्हा विकास अधिकारी एस.के.नवसारे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक उदय कुलकर्णी, जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक व त्यांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सहकार विभागाशी संबंधित केंद्रिय योजनांशी संबंधित विविध समित्यांचे सदस्य व त्यांचे प्रतिनिधी, सहकार विभागाचे…
परभणी (प्रतिनिधी) २६ डिसंबर १९२५ रोजी कानपूर उत्तर्रदेश येथे स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे, त्यागाची, बलिदानाची व अविरत संघर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष २६ डिसेंबर २०२४ रोजी ९९ वबें पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शताब्दी वर्षात संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कमिटी च्या वतीने गुरुवार दि.२६ रोजी दुपारी १२:०० ‘वाजता पक्ष सभासद, त्यांचे कुटुंबीय, समाजवादी, आंबेडकर वादी, कामगार कर्मंचारी, शेतकरी, शेतमजूर. महिला,वियार्थी-युवक,सांस्कृतिक-साहित्थिक चळवळीतील कार्यकर्त्याचा, पत्रकाराचा, सहानुभूतीदारांचा व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्याचा स्नेह मेळावा शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. या निमितानेपुरोगामी विचाराचेव…

