परभणी,(प्रतिनिधी) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी महोत्सवा निमित्ताने गुरुवार 26 डिसेंबर रोजी येथील कार्यालयावर कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
दि. 26 डिसेंबर 1926 रोजी कानपूर उत्तर प्रदेश येथे स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 99 वर्षे पूर्ण होवून 100 वर्षात पदार्पण करत आहे. शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्ष सभासद व त्यांचे कुटुंबीय तसेच समाजवादी, अंबेडकरवादी, कामगार – कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी – युवक, साहित्यीक – सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, सहानुभूती दार, धर्म निरपेक्ष पक्ष तथा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.
या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. सुनील मोडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कमीटी सदस्य कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सेक्रेटरी कॉ. अॅड माधुरी क्षीरसागर यांनी केले तर प्रमुख पाहुणे आमोल जाधव, कॉ. शेख आब्दुल भाई यांनी विचार मांडले. कॉ. शिवाजी कदम यांनी सुत्रसंचालक केले तर ओंकार पवार यांनी आभार मानले.
यावेळी कॉ. लक्ष्मण काळे, कॉ. बालाजी पौळ, कॉ. शहाणे, कॉ. सैय्यद अजहर, कॉ. प्रसाद गोरे, कॉ. मितेश सुक्रे, कॉ. मुंजाभाऊ लिपणे, कॉ. उद्धव देशमुख, कॉ. मुगाजी बुरुड, कॉ. अंगद भोरे, सिकंदर भाई, शेख जहिर, कॉ. देविदास खरात, कॉ. अरूण हारकळ, कॉ. मधुकर गाडेकर, पठाण वाहेद, आशोक कांबळे, पांडुरंग पौळ, अनिस, लक्ष्मण घोगरे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



