परभणी (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोप करीत या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल असे वक्तव्य लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले. लोकसभा विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर आले असता आज दुपारी त्यांनी स्व. सुर्यवंशी या युवकाच्या कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर नवा मोंढा येथील निवासस्थानी परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की आपण सुर्यवंशी कुटूंबियांचे सांत्वन केले, त्यांचे म्हणणे ऐकले. एकूण स्थितीची माहिती घेतली आहे. सुर्यवंशी या युवकाच्या हत्येस केवळ पोलिस जबाबदार असल्याचे स्पष्ट…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानलपेठ, येथे दिनांक 24 डिसेंबर 2024 वार मंगळवार रोजी कै. म.शं. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2024 हे वर्ष कै.म.शं. शिवणकर गुरूजी यांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या स्पर्धेचे 49 वे वर्षे असून , ही स्पर्धा इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यासाठी निःशुल्क असून पुढील पैकी एका विषयावर प्रत्येक शाळेतून एका स्पर्धकास आपले विचार मांडता येतील. प्रत्येक स्पर्धकास आपले विचार व्यक्त करण्यासाठी पाच मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकास प्रथम पारितोषिक 2500 रू , द्वितीय पारितोषिक 2000 रू , तृतीय पारितोषिक 1500 रू…
पालम (प्रतिनिधी) दि 21 रोजी गहिनीनाथ उर्फ गैबीसाहेब यात्रा कमिटीची मिटिंग संपन्न झाली यावेळी अण्णासाहेब नारायणराव किरडे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व गावाकरी यांच्या सर्वानुमते यात्रा कमिटी अध्यक्ष म्हणून भागवत राजेभाऊ किरडे यांनी निवड करण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेली इतर कार्यकारिणी त उपाध्यक्ष साहेब गोविंदराव नखाते सचिव अंगद उत्तमराव किरडे कोश्याधाक्ष राजेश सुभाषराव किरडे व सदस्य पदी ऋषिकेश चव्हाण. पंडित पवार.अहमद खान पठाण शारुख शेख.पांडुरंग नखाते. वैजेनाथ इंदोरे राजेभाऊ किरडे कृष्णा गव्हाणे हनुमान गव्हाणे शिवाजी दिवसें गंगाधर मस्के नवनाथ भोंगळे संतोष पैके मारोती सुरणार मारोती तूरणर रुस्तुम पिंजारी त्रिंबक किरडे इसाक कुरेशी तर मार्गदर्शक मनून तातेराव किरडे विनोद किरडे ( तंटामुक्ती…
खेळाडूंनी लॅक्रॉस खेळा कडे करीअर म्हणून पाहावे – डॉ.बाबर सेलू (.प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य लॅक्रास असोसिएशन व परभणी जिल्हा असोशियन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने १ ली राज्य लॅक्रॉस सब ज्युनिअर व ज्युनिअर क्रीडा स्पर्धा 2024-25.दि ते 21 डिसेंबर 2024 .स्पर्धा उद्घाटन: स.११ वा.श्री हनुमान गड नूतन विद्यालय क्रीडांगण सेलू येथे उद्घाटन डॉ.व्हि.के. कोठेकर (सचिव, नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष:- डॉ.एस.एम.लोया (अध्यक्ष नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू) प्रमुख पाहुण्या डॉ. सुमेधा ठाकुर (अध्यक्ष: महाराष्ट्र लॅक्रॉस असोसिएशन) डॉ. मोहम्मद बाबर (राज्य सचिव महाराष्ट्र लेक्रास असोसिएशन) संतोष पाटील (मुख्याध्यापक ) किरण देशपांडे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास…
परभणी,(प्रतिनिधी) : गंगाखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक या पदाचा अतिरिक्त कारभार असणार्या प्रकाश विठ्ठलराव टाक या कर्मचार्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित तक्रारकर्त्याकडून 4 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याची तयारी दर्शविल्याबद्दल गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गंगाखेड येथील या तक्रारकर्त्याने नगरपरिषद हद्दीतील प्लॉट खरेदी करणे असल्याने 3 डिसेंबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात किती शुल्क लागेल, अशी विचारणा केली. तेव्हा तेथील प्रकाश टाक या लिपीकाने खरेदीखत करण्याकरीता सहा ते सात हजार रुपये लागतील व त्या व्यतिरिक्त 1 हजार रुपये आणखीन लागतील, असे नमूद केले. संबंधित तक्रारकर्त्याने शुल्का व्यतिरिक्त मागितलेली 1 हजार रुपयांची रक्कम द्यावयाची…
पालम ( प्रतिनिधी) परभणी विभागातील विभागीय वाहतूक अधिकारी सोळंके व विभाग नियंत्रक सचिन डफळे यांनी विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी शेख राजूर बस चालू करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यापासून व प्रवाशाच्या सोयीसाठी खेड्या वस्तीमध्ये नव्याने बस चालू केल्याबद्दल गावकऱ्यांतर्फे बस महामडंळाच्या वरिष्टचे अभिनंदन केले. तसेच मोलाचे मार्गदर्शन गंगाखेड आगार प्रमुख निकाळजे यांनी बस चालू करण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन शेख राजूर येथिल सरपंच लक्ष्मण पवार व विद्यार्थी विष्णू कदम,अथर्व दळवे, माधव भंडे,नागेश पवार,ज्ञानेश्वर साखरे,अनिल खेडकर,पांडुरंग कोंडापुरे,किरण खेडकर,ओमकार भंडे, रामेश्वर गाणार, साईनाथ पांचाळ, वैभव विखे, मोतीराम विखे, देवराव भंडे, नारायण चाबरे, सचीन बनसोडे, सुरज कदम, रमाकांत खेडकर, दत्ता कदम,सोनु कदम,अभिजीत देशमुख,…
अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा परभणी,(प्रतिनिधी) अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन हे अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित आहे. याचा सर्व अल्पसंख्यांक समाजातील वंचित घटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी यावेळी केले. संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तूत केला होता. त्याकरिता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरिता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क…
परभणी, (प्रतिनिधी)– समाजात आज विस्तारीत जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनीच सामाजिक सलोखा आणि शांततेकरीता पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची झालेली अवमानाची घटना व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ॲड. मेश्राम आज परभणी शहराच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्ताने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. ॲड. मेश्राम यांनी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर परिसराची पाहणी केली व घडलेल्या घटनेची…
परभणी (प्रतिनिधी) डाॅ घनश्यामराव देशपांडे रा.रामकृष्ण नगर परभणी ( हल्ली मुक्काम पुणे) यांच पुणे येथे दु:खद निधन दि.17.12.2024 रोजी झाले. मृत्यू समय त्यांचे वय 75 वर्षे होते . डॉ घनश्याम देशपांडे हे मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे प्लॅन्ट पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट चे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन सन 2010 मध्ये सेवा निवृत्त झाले होते. पश्चात दोन मुली व नातवंड पुणे येथे आहेत. त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
परभणी,(प्रतिनिधी) : राहणार नांदखेडा येथील शांताबाई वसंतराव पांडे यांचे मंगळवारी (दि.17) रोजी रात्री अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 84 वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुनील वसंतराव पांडे यांच्यां त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थीवावर उद्या बुधवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता नांदखेडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लोकसंचार परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.

